कोरोना व्हायरसचा नवा आवतार Delta Plus,नियम पाळा धोका टाळा

कोरोना व्हायरसचा नवा आवतार Delta Plus,नियम पाळा धोका टाळा

राज्यात तिसऱ्या (Coronavirus third wave) लाटेचा धोका असल्याचं बोललं जात आहे. राज्यानं नियुक्त केलेल्या टास्क फोर्सनं बुधवारी सांगितलं. कोविडच्या नियमांचं योग्य पालन न केल्यास एक ते दोन महिन्यांत महामारीची तिसरी लाट (Third Wave)राज्यात येण्याची भीती असल्याचं मत टास्क फोर्सनं ( Task Force)व्यक्त केलं. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं (Maharashtra Government) आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिल्या.

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट डेल्टा प्लस (Delta plus) हा राज्यात तिसऱ्या लाटेत शिरकाव करण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. Delta Plus Variant आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमधून गोळा झालेल्या 21 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी येथे दिली.

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रासमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)आता डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta-Plus Variant) राज्यातील पाच जिल्ह्यांमधून गोळा झालेल्या 21 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. सध्या नमूने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यानं दिली आहे.

दिलासादायक बातमी म्हणजे, मुंबईत घेतलेल्या कोणत्याही (None in Mumbai)नमुन्यांमध्ये या व्हेरिएंट आढळून आलेलं नाही. नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जळगाव जिल्ह्यातून गोळा झालेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत 20 नमुन्यांमधून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. मात्र अंतिम पुष्टीकरणासाठी नमुने NIV कडे पाठवण्यात आले असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

हे लेख वाचा ———————————-

<

Related posts

Leave a Comment