दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना स्वतःमधील क्षमता (टॅलेंट), आवड यांची सांगड घालून करिअरची निवड करावी लागते. दहावीनंतर काय करायचे यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. स्वतःची आवड व क्षमतांची तपासणी करुन त्यांना करिअरची वाट निवडावी लागणार आहे. त्यांच्यासमोर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबत अभियांत्रिकी व आयटीआयसारखे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अधिक उज्वल असल्याचे करिअर तज्ज्ञांचे मत राहात आहे. Career Guidance| What after 10th? How to choose an area? Guidance to remove doubts in the minds of students
करिअर निवडण्याची पारंपरिक पध्दत
- आई-वडील, नातेवाईक सांगतील ते करिअर निवडणे
- मित्र किंवा मैत्रिणी जे निवडतील ते करिअर निवडणे
- आवड आहे म्हणून त्या क्षेत्रात करिअर निवडणे (उदा. क्रिकेट आवडते पण करिअर होत नाही)
- स्वतःच्या क्षमता व आवडीचा सांगड न घालता करिअर निवडणे
- दहावीच्या टक्केवारी नुसार शाखा निवडणे
करिअर निवडण्याची शास्त्रीय पध्दत
- कलचाचणी अहवालाचा अभ्यास करणे
- स्वतःमधील टॅलेंट व आवडीचा अभ्यास करुन करिअर निवडणे
- टॅलेंट समजून घेत समुपदेशकांशी चर्चा करुन करिअर निवडणे
- करिअर निश्चिती होत नसेल तर एखादी शाखा निवडून स्वतःला करियरसाठी अवधी देणे
- दोन ते तीन टॅलेंट स्ट्रॉंग आहेत लक्षात घेऊन करिअर निश्चित
हे आहे टॅलेंट
१. दृष्टीची निपुणता : कल्पना करणे. हे विद्यार्थी सहजतेने चांगले ड्रॉइंग , पेंटिंग काढू शकतात नकाशा चांगल्या पद्धतीने समजू शकतात . करिअर: आर्किटेक्ट , इंजिनिअर , इंटेरियर डिझायनर इ.
२. भाषेची निपुणता : हे विद्यार्थी लिहिताना, बोलताना शब्द चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. गोष्टी लिहिणे, माहिती लक्षात ठेवणे, वाचणे सहजतेने करतात.
करिअर : लेखक , पत्रकार , वकील , शिक्षक इ .
३. गणितीय निपुणता : हे विद्यार्थी सहजतेने व आवडीने गणिते सोडवितात.
करिअर : इकॉनॉमिस्ट , CA , ऑडिटर , इंजिनिअर , अकाउंटंट , कॉम्प्युटर प्रोग्रॅमर इ .
४ शारीरिक निपुणता : हे विद्यार्थी शारीरिक हालचाली सहजतेने करू शकतात
करिअर : ॲथलिट्स, डान्सर, ॲक्टर, बिल्डर, सोल्जर्स
५. संगीत निपुणता : हे विद्यार्थी संगीत व आवाजाबद्दल संवेदनशील असतात.
करिअर : गायक, वादक, म्युझिक टीचर इ .
६. व्यक्तिगत निपुणता : या विद्यार्थ्यांचे स्वतः सोबत चे रिलेशन चांगले असतात. स्वतःच्या भावना, विचार व्यवस्थित समजू शकतात.एकटे राहून काम करतात.
करिअर : लेखक , तत्त्वज्ञानी , सिद्धांतवादी , शास्त्रज्ञ इ .
७. सामाजिक निपुणता : हे विद्यार्थी इतरांच्या भावना समजून घेण्यात व इतरांसोबत सहजतेने मिसळतात.
करिअर: मॅनेजर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, सेल्स पर्सन, मानसोपचार तज्ञ इ .
८. नैसर्गिक निपुणता : हे विद्यार्थी निसर्गाबद्दल संवेदनशील असतात.
विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आवडी व क्षमतांची सांगड घालून पालक, शिक्षक व समुपदेशकांशी विचार विनिमय करायला हवा. आठपैकी कोणचे टॅलेंट आपल्यामध्ये चांगले आहेत हे समजून घेत चांगले निर्णय घ्यावेत, असा सल्ला करियर समुपदेशक सुयश पुकाळे यांनी दिला आहे. Career Guidance| What after 10th? How to choose an area? Guidance to remove doubts in the minds of students