MPSP Recruitment अराजपत्रित गट ब 800 पदांची भरती जाहीर, MPSC ची घोषणा |Non-Gazetted Group B mpsc declared recruitment of 800 posts

MPSP Recruitment अराजपत्रित गट ब 800 पदांची भरती जाहीर, MPSC ची घोषणा |Non-Gazetted Group B mpsc declared recruitment of 800 posts

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.(mpsc declared recruitment for 800 various vacancies) MPSP Recruitment Non-Gazetted Group B declared recruitment of 800 posts

या परीक्षेमुळे विविध संवर्गातील 800 पदांवर भरती केली जाणार. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या आधीही 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सहायक कक्ष अधिकारी (MPSC Group B Result 2022 for ASO Prelims Exam) पदासाठीचा निकाल 1 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता. MPSP Recruitment Non-Gazetted Group B declared recruitment of 800 posts

MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत महत्‍वपूर्ण बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्‍या (MPSC) राज्‍यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्‍वपूर्ण बदल केलाय. त्‍यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्‍के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्‍य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. MPSP Recruitment Non-Gazetted Group B declared recruitment of 800 posts

असा असेल बदल..
आता राज्‍यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्‍यानंतर, ज्‍या उमेदवारांना किमान ३३ टक्‍के गुण अर्थात ६६ किंवा त्‍यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्‍या गुणांच्‍या आधारे राज्‍यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्‍याने कला, वाणिज्‍य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्‍या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्‍ध होऊ शकतील.”

MPSP Recruitment Non-Gazetted Group B declared recruitment of 800 posts

https://www.youtube.com/watch?v=t2q-2slC5uQ&t=30s

हेही वाचा ——-

<

Related posts

Leave a Comment