कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?
शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji bapu patil सोशल मीडियावर चर्चेत आहेत. शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गुवाहाटीचं केलेलं वर्णन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Shivsena Ex Leader Eknath Shinde यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. Who is Sangola MLA Shahaji Bapu?
अनेक दिवसांपासून शहाजी बापू पाटील MLA Shahaji Bapu यांच्याशी संपर्क न झालेल्या एका कार्यकर्त्यानं आमदार साहेबांना फोन केला. आहात कुठे अशी विचारणा कार्यकर्त्यानं केली. त्यावर ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ असं वर्णन बापू पाटलांनी गावरान भाषेत केलं. त्यांनी केलेल्या वर्णनाची सध्या सोशल मीडियावर हवा आहे. अनेकांनी त्यांचे डोंगरावरचे फोटो ‘काय झाडी, काय डोंगार’ या Kay Jhadi Kay Dongar Kay Hatil okk hay कॅप्शनसह सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
सोशल मीडियावर सध्या ‘काय झाडी, काय डोंगार’ची चांगलीच हवा आहे. मीम्सचा नुसता पाऊस पडला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती शाहजी बापू पाटलांची सोशल मीडियावर चर्चा आहे. बापू पाटील सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. १९८५ मध्ये त्यांनी Shetkari Kamgar Parti शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख Ex MLA Ganpatrao Deshmukh यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र पाटलांचा पराभव झाला. पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले.
१९९५ मध्ये शहाजी बापू पाटील अवघ्या १९२ मतांनी निवडून आले. गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव झाला. २०१९ मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. चार पराभव पाहिल्यानंतर पाटील विजयी झाले. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत यांचा पराभव अवघ्या ७६८ मतांनी पराभव करत पाटील विधानसभेत पोहोचले.
२०१९ मध्ये शहाजी बापू पाटलांनी भाजपकडे तिकीट मागितलं होतं. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं फडणवीस यांनी पाटलांनी सेनेत जाण्यास सांगितलं आणि त्यांना सांगोल्यातून निवडून आणलं. त्यामुळेच पाटील आणि फडणवीस यांचे उत्तम संबंध आहेत. फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असं बापू पाटील कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना म्हणाले. फडणवीस मला भावासारखे आहेत आणि शिंदेसाहेब माझ्याकडे मुलाच्या नजरेनं पाहतात, असं पाटलांनी कार्यकर्त्याला सांगितलं.
हे ही वाचा —-
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यता
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीख
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट
- मद्यप्रेमींना मोठा झटका! महाराष्ट्रात दारू महागली, दरात ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ