BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti
मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti
“आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार अर्थातच पक्षाचे आमदार तिकडे गेले नाही तर काही अपक्ष आमदार त्यांच्याकडे गेले. काही जणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्यात आला. तर कुठे वेगळे व्यवहार झाले. आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असे मी समजत नाही. पहिल्या पसंतीची ३३ मतं संजय पवार यांना मिळाली. तर धनंजय महाडिक यांचा दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर विजय झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळपास जिंकलो होतो. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“संजय राऊत काठावर वाचले, अन्यथा काहीतरी उलट झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते, पण आमचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले.”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. “गेम प्लॅनिंगमध्ये आम्ही मागे राहिलो, तर गेम प्लॅनिंगमध्ये देवेंद्र फडणवीस विजयी झाले. भाजपने संपूर्ण निवडणूक नियोजनानुसार लढवली आणि आम्ही त्यांच्या गेम प्लॅनमध्ये अडकलो. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असे नाना पटोले म्हणाले. BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्ही चारही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज वर्तवला होता. काय चूक झाली याचा अभ्यास करून निश्चितपणे विश्लेषण केले जाईल.” महाविकास आघाडीचे संजय राऊत (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि इम्रान प्रतापगढ़ी (काँग्रेस) विजयी झाले आहेत. पहाटे ४ वाजता जाहीर झालेल्या निकालात शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा मोठा पराभव झाला. कोल्हापूरचे माजी खासदार महाडिक आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवार यांच्यातच लढत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते.
हे ही वाचा —-
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागा
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.
- जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
- अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवार