Mosoon News | पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज काय ? कुठे किती पडणार

Mosoon News | पुढचे पाच दिवस  मुसळधार पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज काय ? कुठे किती पडणार

The next five days will be torrential rain, what is the weather forecast? How much will fall where

मुंबई : आतापर्यंत (Monsoon) मान्सूनच्या आगमनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता मान्सून (Maharashtra) राज्यात सक्रीय तर होणारच आहे पण 11 जून नंतर तो आपले रुपही बदलणार आहे. 11 जून म्हणजेच शनिवारपासून राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज (Meteorological Departmentहवामान विभागाने वर्तवला आहे. The next five days will be torrential rain, what is the weather forecast? How much will fall where

त्याची चूणुक उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाहवयास मिळाली आहे. शनिवारी दुपारनंतर राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय राज्यभर मान्सून सक्रीय तर होईलच पण धुवाधार बॅटींग करेल असा अंदाज आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस होणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

मान्सून राज्यामध्ये दाखल होण्यास उशीर झाला असला तरी आता ज्या पध्दतीने बरसणार आहे तो सर्वासाठी दिलासा असणार आहे. कारण शुक्रवारी तळकोकणातून त्याने राज्यात एंन्ट्री केली असली तरी तो वेगाने सर्वत्र व्यापत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह तर दुणावरणारच आहे पण रखडेलेल्या कामांनाही वेग येणार आहे. शुक्रवारी कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर शनिवारी मान्सून मुंबईसह उपनगरात आणि मध्य महाराष्ट्रात बरसला आहे. शिवाय विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या असून पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही आगमन झाले आहे.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची आगेकूच

कोकणात दाखल झालेला पाऊल अल्पावधीतच महाराष्ट्र कव्हर करीत आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अमरावतीत दुपारी 4 वाजता दरम्यान अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

आता शेती कामाला वेग

शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती चाढ्यावर मूठ ठेवण्याची. पावसाच्या आगमनाने खरीपपूर्व मशागतीची कामे उरकती घेता येणार आहे. शिवाय 75 ते 100 मिमी पावसाची नोंद होताच शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यासाठी सज्ज राहणार आहे. यंदा पावसाचे उशीरा आगमन झाले असले तरी आता ज्या पध्दतीने तो बरसत आहे त्यामुळे सर्वच प्रश्न मार्गी लागतील असा आशावाद आहे. The next five days will be torrential rain, what is the weather forecast? How much will fall where

हे ही वाचा ——

<

Related posts

Leave a Comment