Asad Ahmed Encounter | बुलडोझर बाबा अब एन्काऊंटर बाबा; मिट्टी में मिला दुंगा

Asad Ahmed Encounter | बुलडोझर बाबा अब एन्काऊंटर बाबा; मिट्टी में मिला दुंगा

असद अहमद न्यूज: उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. झाशी येथे त्यांची चकमक झाली. त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफचा दावा आहे. Atiq Ahemd Asad Ahmed Encounter

या चकमकीबाबत, यूपी पोलिसांनी माहिती दिली की, असदचा मुलगा अतिक अहमद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. या दोघांकडून अनेक विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

चकमकीच्या वृत्ताला दुजोरा देताना पोलिसांनी सांगितले की, दोघांनी अतिकला उत्तर प्रदेशात आणणाऱ्या पोलिस ताफ्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. “सरकारने माफियांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. आम्हाला माहिती होती की आरोपी अतिक आणि अशरफ यांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी त्यांना यूपीत परत आणणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो. या प्रकरणात (उमेश पाल खून प्रकरण) या माहितीच्या आधारे, नागरी पोलिस आणि विशेष दलांची पथके तैनात करण्यात आली होती,” असे यूपी पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले.

झाशीच्या परिछा धरण पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या चकमकीत असद आणि गुलाम यांच्याकडून पोलिसांच्या पथकाने 455 बोअरचे 1 ब्रिटीश बुलडॉग रिव्हॉल्व्हर, 7.63 बोअरचे वॉल्थर P88 पिस्तूल जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, झाशीतील बाबिना रोड येथे झालेल्या चकमकीत एकूण 42 राऊंड गोळीबार करण्यात आला.

<

Related posts

Leave a Comment