कोण आहे अतिक अहमद संपूर्ण कुंडली | Whos Atiq Ahemd About Information In Marathi

कोण आहे अतिक अहमद संपूर्ण कुंडली | Whos Atiq Ahemd About Information In Marathi

कोण आहे अतिक अहमद? संपूर्ण माहिती Whos Atiq Ahemd About Information In Marathi अतीक अहमद हे उत्तप्रदेशमधल्या (UttarPradesh) गुन्हेगारी विश्वातलं एक मोठं नाव होतं. गुन्हेगारी विश्व असो की राजकीय विश्व अतीक जे बोलत होता तेच होत होतं.  केवळ प्रयागराजचन नाही तर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये त्याची दहशत होती. असं बोललं जातं की अतीक ज्या जमीन, घर किंवा बंगल्यावर हात ठेवत होता, त्यांचे मालक ते हक्क सोडून निघून जात होते. 

वडील टांगा चालवायचे
10 ऑगस्ट 1962 ला इलाहाबादमध्ये अतीक अहमदचा चकिया येथे जन्म झाला. अतीकचे वडील फिरोज अहमद टांगा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. अतीक घराजवळच असलेल्या शाळेत शिकत होता. पण त्याला शिक्षणात फारशी रुची नव्हती. 10 वीत नापास झाल्यानंतर तो काही वाईट मुलांच्या संगतीत आला. झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने मित्रांबरोबर दरोडे, अपहरणासारखे गुन्हे करायला सुरुवात झाली. पवयाच्या 17 व्या वर्षी अतीकच्या नावावर हत्येचा पहिला गुन्हा दाखल झाला. 

त्या काळात इलाहाबादमध्ये चांद बाबा नावाच्या आरोपीची दहशत होती. सामान्य नागरिक, पोलीस आणि राजकीय नेतेही चांद बाबाला वैतागरे होते. अतीकने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि त्याने पोलीस आणि राजकीय नेत्यांशी जवळीक साधत चांद बाबाविरोधात श्ड्डू ठोकला. काही दिवसात अतीक चांद बाबापेक्षा मोठा गुंड बनला. याला काही अंशी पोलीसांचा वरदहस्तही कारणीभूत ठरला.

1989 मध्ये राजकारणात प्रवेश
एका गुन्ह्यात 1986 मध्ये अतीक अहमदला पोलिसांनी अटक केली. पण अतीकचे राजकीय संबंध चांगले होते. दिल्लीतून एक फोन आला आणि अतीक तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातून सुटल्यानंतर अतीकने 1989 मध्या राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. इलाहाबाद शहर पश्चिमी मतदारसंघातून त्याने विधासभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्याचा मुकाबला चांद बाबाशी होती. दोघांमध्ये गँगवॉर सुरु झाला. परिसरात अतीकची इतकी दहशत होती की अतीक निवडणुकीत विजयी झाला. त्यानंतर काही दिवसांनीच भर चौकात दिवसाढवळ्या चांद बाबाची हत्या झाली.

खासदार, प्रयागराज विधानसभेचा सदस्य, समाजवादी पार्टीचे सदस्य, आणि स्वतःचा अपना दल या पक्षाचे अध्यक्ष. याव्यतिरिक्त बाहुबली गुंड अशी अतीक अहमद या व्यक्तीची ओळख आहे. या व्यक्तीवर जवळपास 100 च्या वर फौजदारी गुन्हे दाखल असून मर्डर, हाफ मर्डर, खंडणी, बेकायदा जमिनीवर कब्जा, जीवे मारण्याच्या धमकी, अपहरण इत्यादी स्वरूपातील गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 2019 पासून तो तुरुंगामध्ये असून कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उमेश पाल यांच्या हत्येत त्याचा थेट सहभाग असल्याने त्याला अटक झाली होती.

उमेश पाल यांच्या हत्येचा थेट साक्षीदार असणारे राज पाल यांच्या घरामध्ये घुसून दोन पोलीस अधिकाऱ्यांसह त्यांची हत्या अतिक अहमद याच्या मुलाने केली. आणि याचा मास्टर माइंड अतीक अहमद हाच होता असे यूपी पोलिसांचे म्हणणे होते.

या अतिक अहमद ची दहशत इतकी होती की याने देवरिया तुरुंगामध्ये बसून मोहीत जयस्वाल या व्यवसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून जबर खंडणी वसूल करण्याचा प्रयत्नही केला होता. ते अपहरण त्याने तुरुंगात बसून केले असल्याने त्या तुरुंगातून त्याला दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले होते.

प्रयागराज मध्ये या अतीक अहमद ची दहशत मोठ्या प्रमाणात होती. प्रत्यक्षात पोलीस प्रशासन ही याला हात घालायला घाबरत होते. तसेच याचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी आणि पक्षांशी थेट संबंध असल्याने याची मनमानी प्रयागराज मध्ये चालत होती.

या अतीक अहमदच्या हत्येमुळे अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया येत असल्या तरी प्रयागराज मधील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या अतिक अहमदच्या कचाट्यातून प्रयागराज च्या लोकांची सुटका झाली असून लोक योगी सरकारला याबाबत धन्यवाद देत आहेत आणि आनंद साजरा करत आहेत.

<

Related posts

Leave a Comment