मनसे नेते वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी; या पक्षात जाणार असल्याची चर्चा ?

मनसे नेते वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी; या पक्षात जाणार असल्याची चर्चा ?

पुणे : मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे आणि त्यांचे समर्थक देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. pune-mns-city-president-vasant-more-left-from-mns-party

राज ठाकरे (Raj Thackray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. भोंगे जर काढत नसतील तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. pune-mns-city-president-vasant-more-left-from -mns-party

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षाच्या पदावरुन हटवल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वसंत मोरे हे पक्षाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून ही बाहेर पडले आहेत. आज राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना बोलावलं होतं. पण वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.

मनसे अध्यक्ष (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 9 एप्रिलला ठाण्यात सभा होणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे या मुद्द्यावर पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेचा तडकाफडकी राजीनामा देऊन रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे वसंत मोरे जर पक्ष सोडून गेले तर मनसेला पुण्यात पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

<

Related posts

Leave a Comment