या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट

या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांना याचा गांभीर्याने तपास करत दगडफेक करणाऱ्या युवतीला ताब्यात घेतले आहे.

ही तरुणी आज बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला व्हिलचेअरवर घेऊन आली आणि ‘अशोक चव्हाण आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे’ म्हणून सुरक्षा रक्षकांना विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी ‘साहेब नाहीत’ म्हटल्यानंतर चिडलेल्या तरुणीने गोंधळ घालत निवासस्थानावर दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र तोपर्यंत तरुणी आईसह निघून गेली होती. ही तरुणी उच्च शिक्षित असून तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ही तरुणी काबरा नगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. केवळ चव्हाण यांना भेटता आले नाही म्हणून या तरुणीने दगडफेक केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तरुणी विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकीमुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात होते. मात्र, आता या घटनेला पुर्णविराम मिळाला आहे.

=========================================

<

Related posts

Leave a Comment