टीईटी परीक्षा पेपरफुटी घोटाळ्यात अटक आरोपी परिक्षा मंडळाचे अध्यक्ष सुपे यांच्या घरी सापडलं मोठ घबाड

टीईटी परीक्षा पेपरफुटी घोटाळ्यात अटक आरोपी परिक्षा मंडळाचे अध्यक्ष सुपे यांच्या घरी सापडलं मोठ घबाड

Accused arrested in TET exam paperfoot scam

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी TET) पेपर फोडल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. त्यानंतर आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली. टीईटी परीक्षेत पैसे घेऊन अनेकांना पास केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

‘कुंपणच शेत खात असेल तर आपण कोणाकडे अपेक्षेने बघणार? परिक्षा मंडळाचे अध्यक्ष सुपे यांच्या घरीच जर घबाड सापडत असेल तर यापेक्षा अशी नाचक्की राज्यातील शिक्षण व्यवस्थेत कधीच झाली नसेल. याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याची चौकशी सीबीआय किंवा एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत होण्याची गरज आहे.’ अशी मागणी केली आहे.

याप्रकरणी परीक्षेचा कंत्राट दिलेल्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तपासात या घोटाळ्यात तुकाराम सुपेंसह अनेकांचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी जालना, लातूर, औरंगाबादेत छापे टाकत अनेक महत्वाचे कागदपत्रे हस्तगत केले आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जीए टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून आणखी काहीजणांना टप्प्याटप्प्याने अटक करण्यात येणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

<

Related posts

Leave a Comment