पिक विमा भरण्याची मुदत आज संपत आहे.ही मुदत वाढवून देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.पण मुदत वाढल्याने विमा भरण्यासाठी गर्दी वाढेल असं अजिबात नाही. Farmers are not intrst on crop insurance scheme कारण विमा कंपन्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे.त्यांना फसवलं आहे.गेल्या वर्षी शेतकर्यांच मोठं नुकसान झालं.. तरीही विमा कंपन्यांनी शेतकर्यांना दमडी देखील दिली नाही.. सोयाबीनच्या नुकसानीचे ऑनलाईन फोटो दोन दिवसात पाठवा असे फर्मान विमा कंपन्यांनी काढले.. फोटो पाठविणार्या शेतकर्यांची संख्या हातच्या बोटावर मोजण्या एवढी देखील नाही.. त्यांना नुकसान मिळाले.. ज्यांनी पाठविले नाहीत ते वंचित राहिले.. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शेतकर्यांना लुटण्याचा हा डाव होता.एकाच सर्व्हे नंबर मधील एका शेतकर्यांच नुकसान झालं आणि दुसर्याच नाही असं होत नाही.. पण तसं झालं.. बीड पॅटर्न म्हणून ज्याचा नाहक गवगवा केला गेला त्या बीडची ही कथा आहे..
खरं तर या लुटमारीवर लोकप़तिनिधीं व शेतकरी संघटनांनी अंकुश ठेवायला हवा होता.. आवाज उठवायला हवा होता.. दुर्दैवाने हा वर्ग गप्प आहे.. कारण असं सांगितलं जातं की, यातील बहुसंख्य विमा कंपन्यांचे लाभार्थी आहेत..त्यामुळे विमा सोडून बोला असं म्हणण्यासारखी स्थिती आहे.. महाराष्ट्रात गेली आठ दिवस ब्रा वर जेवढी चर्चा सुरू आहे तेवढी चर्चा विम्यावर झाली असती तर हजारो शेतकर्यांचे कोटकल्याण झाले असते.. Farmers are not intrst on crop insurance scheme
दिवसा ढवळया अशी लूट सुरू असेल तर शेतकरयांनी का विमा भरावा? खरं तर शेतकरी पीक विमा योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली असती तर शेतकर्यांच्या मागची साडेसाती काही प़माणात तरी कमी झाली असती.. मात्र ती कमी व्हावी अस राजसत्तेला आणि हितसंबंधीयांना वाटतच नसल्याने एवढी लूट सुरू असताना एकही मायचापूत या विषयावर बोलत नाही.. या मौनामागचं गूढ आपण समजून घेतलं पाहिजे. Farmers are not intrst on crop insurance scheme
हे ही वाचा —————————–
- पाकिस्तानवर ड्रोन हल्ले, नऊ शहर बाधित, रडार सिस्टीम उध्वस्त- आंतकियोसे का बदला ऑपरेशन सिंदूर जारी है..!पाकिस्तानात ड्रोन हल्ले: तणाव वाढला आज, गुरुवार, ८ मे २०२५ रोजी, “ऑपरेशन सिंदूर” नंतर भारत आणि…
- Operation Sindoor | टारगेट कसे सेट केले ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?Operation Sindoor सविस्तर माहिती ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सशस्त्र दलांनी बुधवार, ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान…
- Maharashtra Local Body Election| चार महिन्यात निवडणुका घ्या कोर्टाने सुनवले, स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडणूकाचा धुराळा उडणारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. (Maharashtra Local Body Election )कारण येत्या चार महिन्यात…
- Cast Census In India | जात जनगणना म्हणजे काय आणि ती भारतासाठी का महत्त्वाची आहे?नवी दिल्ली: १८८१ ते १९३१ पर्यंत ब्रिटिश राजवटीत जातींची गणना ही जनगणनेचा एक नियमित भाग होती.…
- “दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून, सेना तुमच्या नियंत्रणात नाही का?” पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचे जुने भाषण क्लिप व्हायरलNMV Reporter – “सेना तुमच्या नियंत्रणात नाही का? दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून मिळतात? ते देशात कसे घुसतात?…