बीड ः राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण Maratha Reservation टिकवता आले नाही. आता राज्य सरकारने विनंती याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यात आता सरकारने हलगर्जीपणा करू नये अशी अपेक्षा व्यक्त करत भाजप आमदार सुरेश आण्णा धस यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाचा आवाज त्याला भाजपने पाठिंबा दिलेला आहे तो आवाज सरकारच्या कानावर पर्यंत जावा यासाठी सोमवार दिनांक 28 जून रोजी बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश अण्णा धस यांनी बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
बीड येथे पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस म्हणाले राज्य सरकारला Maratha Reservation मराठा आरक्षण टिकवता आले नाही. फडणवीस सरकारने कोर्टात आरक्षण टेकवले मात्र ,या सरकारला ते जमलं नाही. आरक्षण हा मराठा समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा आवाज राज्य सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी सोमवार दिनांक 28 जून रोजी बीडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणा सोबतच शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करावे, पीक विम्याचा बीड पॅटर्न उलट्या दिशेने चाललाय, यामध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ऊसतोड मजूर म कदम यांच्यासाठी कायदा करून 85 टक्के भाववाढ द्यावी, काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचारी पैकी पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय सेवा भरतीत थेट नियुक्ती द्यावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी सांगितले. मराठा समाजातील तरुणांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे Maratha Reservation
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे…
- बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवालबीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ…
- Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेसमुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार…
- Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारलेआंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज…
- शिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषणमराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस…
Along with Maratha reservation, crop loans should be distributed to farmers immediately, crop insurance bid pattern is going in the opposite direction, inquiries should be made and action should be taken against the culprits. MLA Suresh Anna Dhas said that this morcha is being taken out to demand appointment. He has appealed to the youth of the Maratha community to participate in this march