एका बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड भिडल्या ‘प्रेमाचा राडा’; बॉयफ्रेंड तरुणाने ठोकली धूम…
एका मुलीच्या प्रेमात किंवा एकतर्फी प्रेमातून दोन मुलांमध्ये वादाच्या घटना आपण ऐकल्या असतील मात्र एका प्रियकरासाठी दोन प्रेयसी रस्त्यावर भांडताना पाहिल्या आहेत का? असाच एक प्रकार पैठण बसस्थानकावर पहायला मिळाला. बसस्थानकावर दोन अल्पवयीन तरुणींमध्ये प्रियकरासाठी जोरदार भांडण झाले. एका प्रेयसीला तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरताना दिसल्याची माहिती मिळताच दुसरी गर्लफ्रेंड पैठणच्या बसस्थानकात पोहोचली. अन् मग सुरु झाला राडा. Two girlfriends fight over one boyfriend
दोन्ही महाविद्यालयीन मुलींची हाणामारी सुमारे अर्धा तास चालली
बसस्थानकावरच दोघीजणी एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या. दोघांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यामुळं बसस्थानकावर गर्दी जमा झाली. हा गोंधळ एकीकडे सुरु असताना दुसरीकडे प्रकरण अधिकच बिघडत असल्याचे पाहून तरुण तिथून पसार झाला. दोन्ही महाविद्यालयीन मुलींची हाणामारी सुमारे अर्धा तास चालली. दरम्यान हे भांडणं पाहणाऱ्या प्रवाशांना मात्र हाणामारीचे कारण काही समजत नव्हते. या हाणामारीच्या घटनेची चर्चा मात्र बराच काळ परिसरात रंगली होती. Two girlfriends fight over one boyfriend
खरं कारण समोर आल्यावर पोलिसही चक्रावले
प्रकरणाचे गांभीर्य पाहून बसस्थानकावर तैनात असलेले पोलिस कर्मचारी मुख्तार खान यांनी पोलिस निरीक्षक किशोर पवार यांना माहिती दिली. त्यानंतर महिला पोलिसांसह पैठण पोलिस बसस्थानकावर पोहोचले. गोंधळ घालणाऱ्या ‘त्या’ दोन्ही मुलींना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. तिथं पोलिसांनी त्या दोघींची चौकशी केली. पोलिसांना मारहाणीचे कारण समजल्यावर पोलीसही चक्रावून गेले. एक प्रियकर आणि त्याच्या दोन प्रेयसी असून ‘तो’ माझाच असल्याचा दावा करत होत्या. अन् याच कारणावरून दोन्ही तरुणींमध्ये सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याचे खरे कारण समोर आले.
दोन्ही तरुणी अल्पवयीन
या दोन्ही तरुणी अल्पवयीन असून तिथल्याच एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गर्शनाखाली महिला उपनिरीक्षक लहाने पुढील तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसान
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणी