पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला असून, देशात ३६ वा क्रमांक प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यात पहिली आली आहे. तर नगरचा विनायक नरवाडेने देशात ३७ वा क्रमांक पटकावीत राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या मुख्य परीक्षेचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला आहे. ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निकालात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवारांनी युपीएससीत यश मिळविल्याचे दिसत आहे. पूजा कदम (५७७) आणि आनंद पाटील (३२५) यांनी दृष्टीदोशावर मात करत युपीएससीत यश प्राप्त केले आहे. Great success of students from…
Read More