पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना भाजपने निलंबित केले आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानसह ओआयसी या इस्लामी देशांच्या संघटनेनेही भारतावर कडाडून टीका केली. तसेच आखाती देशांनी भारतीय वस्तूंवर बहीष्कार टाकण्याचीही मागणी केली आहे. कुवेतमध्ये भारतीय उत्पादन रस्त्यावर फेकली जात आहेत. इस्लामिक देशांनी घेतलेलया या आक्रमक भूमिकेचा भारताला आर्थिकदृष्ट्या फटका पडणार आहे. यामुळे नाईलाजाने का असेना भाजपने लगेच नाही पण उशीरा का होईना एक पाऊल मागे जात या इस्लामिक देशांच्या दबावापुढे नमते घेत काही महत्वाचे निर्णय घेतले.…
Read More