वारी पाहण्याचा , लिहीण्याचा विषय नाही . वारी अनुभवण्याचा विषय आहे . मुळात हा विषयच नसून एक अलौकिक अनुभूती आहे . काही महिन्याच्या बाळापासून ते वयाची नव्वदी अोलांडलेली सारी माणसं ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात एकरुप होऊन जातात . जात , पंथ , धर्माचे सारे भेद इथं गळून पडतात . इथल्या वाटेवर कोणीही कोणाला नावाने हाक मारत नाही . जोपर्यंत वारीच्या वाटेवर आहात तोपर्यंत तुमचं नाव केवळ ‘ माऊली ‘ आहे . इथं प्रत्येकजण एकमेकांना माऊली नावाने हाका मारतो . अोळखपत्र लागत नाही . चेहर्यावर विलसत असलेलं माऊलींच्या नामाचं हास्यच इथली अोळख !…
Read More