कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रण पेटले आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्थानिकांनी अगदी आरपारच्या आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेने संघर्ष वाढलेला आहे. तूर्तास ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाच्या चर्चेची पहिली पार पडलीये. गुरुवारी पर्यावरण तज्ञ्ज यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण हा रिफायनरी प्रोजेक्ट नेमका काय आहे? यावरुन राजकारण का होतंय? कोणत्या पक्षाचं काय म्हणणं आहे, हे…
Read More