Seeds Soybean, Tur | शेतकऱ्यांना विद्यापाठाचा सल्ला | तुर, सोयाबीनचे हे वाण पेरण्याचे अवाहन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) ः दि. 4 जून पासून पुढे पाच दिवस ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाचा अंदाज आहे. चांगला पाऊस झाला तर 15 जूनपर्यत कापसाची लागवड करायला हरकत नाही. तसेच तुर, सोयाबीनचे कोणते वाण चांगले उत्पादन देणारी आहेत आणि कोणते वाण पेरायचे याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिलाय.
कापसाबाबत सांगायचे झाले तर जमिनीच्या प्रकारानुसार योग्य कापुस बियाण्याची निवड करावी. लागवड ९०×९० सें.मी. किंवा १२०×६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी जमीन ओलवून घ्यावी. तसेच हेक्टरी १० टन शेणखत द्यावे. रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.
सोयाबीनच्या पेरणीची तयारी करताना जमीन: मध्यम काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी असावी. पूर्वमशागत करताना एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभूशीत करावी. आणि जे एस-३३५, एम ए सी एस-११८८, फुले कल्याणी (डी एस-२२८), जे एस-९३०५, के एस-१०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६) यावाणाची पेरणी करावी.
तूरीची पेरणी करण्याबाबत तयारी करताना जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरिता योग्य असते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुशभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. पेरणीसाठी तुरीच्या विपुला, फुले राजेश्वरी, आय सी पी एल-८७, बी एस एम आर-८५३, बी एस एम आर-७३६, बी डी एन-७११, बी डी एन-७१६ या वाणाची निवड करावी.
दि. 5 जून 2021 पासून पुढील पाच दिवस म्हणजे 9 जून पर्यत सरासरी 36 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज असून किमान 24 ते 36 अंशसेल्सीयस तापमान असेल. वाऱ्याचा वेग 6 ते 17 किलोमीटर प्रती तास असेल. पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत. जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा. शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये.
- महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; कोकण, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्र व्हॉइस, २६ जून २०२५ महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २६
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीखप्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजपुणे, १२ जून २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पुणे वेधशाळेच्या ताज्या अंदाजानुसार, आज (१२ जून) पासून पुढील चार दिवस म्हणजेच १६ जून
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेटअमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत
- पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण करणे आवश्यक आहे – पद्मश्री चैत्रम पवारअण्णा हजारे यांच्यासोबत राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळा आणि वृक्षारोपण आयोजित |State-level environmental workshop, tree plantation held at Ralegan Siddhi with Anna Hazare