Seeds | युवा क्रांती दलाने घेतली व्यापाऱ्यांची झाडाझडती..! बियाणांची जादा दराने विक्री करण्यास मज्जाव.

Seeds | युवा क्रांती दलाने घेतली व्यापाऱ्यांची झाडाझडती..! बियाणांची जादा दराने विक्री करण्यास मज्जाव.

मुदखेड तालुक्यातील खत तथा बी बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची झाडाझडती युवा क्रांती दलाने घेतली. या प्रसंगी मुदखेड शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना तंबी देण्यात आली.
सध्याला कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड हतबल झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीत देखील शहरातील खते आणि बी बियाणे यांचे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ठरवून दिलेल्या अधिकतर खुदरा मुल्यापेक्षाही जादा दराने खतांची विक्री करीत आहेत. तसेच दुसरीकडे दुकानांमध्ये माल उपलब्ध असूनसुद्धा माल नाही असे सांगून माल उपलब्ध करण्यासाठी जादा पैसे हे व्यापारी आकारत आहेत. म्हणजे मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. जर मालाची टंचाई आहे, तर जादा पैसे देताच माल कसा उपलब्ध होतो असा संतप्त सवाल संघटनेने व्यापाऱ्यांना केला आहे.
हे सर्व सर्रास चालू असताना प्रशासन मात्र साखर झोपेत आहे. या दोघांनाही जागे करण्यासाठी युवा क्रांती दलातर्फे आज सत्यशोधमोहीम राबवण्यात आली. यात शहरातील विविध दुकानात जाऊन उपलब्ध मालाची शहानिशा करण्यात आली असता व्यापाऱ्यांची लबाडी उघडी पडली. त्या सर्व व्यापाऱ्यांना धारेवर धरून चौकशी केली. व इथून पुढे देखील हे सर्व असेच चालू राहिल्यास व्यापाऱ्यांवर युवा क्रांती दल गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. असे निवेदन कृषी अधिकारी यांना दिले आहे. सदरील निवेदन देण्यास युवा क्रांती दलाचे सचिव प्रशांत पाटील मुंगल, ज्ञानेश्वर मगरे, नंदकिशोर पवार, शरद पवार, शिवम मगरे, महेश पवार, महेश पवार, शिवशंकर पेरके, चक्रधर कळणे, मनोज झमकडे, विकास कदम तसेच किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.

<

Related posts

Leave a Comment