मुंबई, दि. १५ :- महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्याचं ब्रॅन्डिंग करणे, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणे आदी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेबांनी केलेल्या सूचनांवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर झालेल्या बैठकीत विचार मांडताना उपमुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो. सहाद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या कृषी, फलोत्पादन विभागातर्फे राज्यातील फलोत्पादनाबाबत सादरीकरण करण्यात आले.
बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात फलोत्पादनवाढीला व फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळनिर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी, आदी सूचनाही खासदार शरद पवार यांनी
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेतमहाराष्ट्रातील 2022 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेल्या पूजा खेडकर, तिच्या अधिकाराची मर्यादा…
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज30 जुलै, मंगळवार रोजी चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रात 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत पदक…
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णयमुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास…
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णयजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या सुधारित शासन निर्णय 18 जूनला राज्य सरकारने प्रसिद्ध केला…