Online Team | पंढरपुर येथे होत असलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर कोरनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या सह मानाच्या दहा पालखी सोहळे एसटीतूनच पंढरपुरला जाणार आहेत. एका पालखी सोहळ्यासाठी दोन वाहने असुन प्रत्येक वाहनात तीस लोक असतील. राज्य मंत्रीमंडळात हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगितली.
पालखी सोहळ्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कोल्हापुर, सातारा, पुणे, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यातील पोलिस खाते व प्रशासनातील अधिकारी यांची समिती केली होती. आषाढी वारीबाबत समिती व वारकरी सांप्रदायातील लोकांसोबत पालखी सोहळ्याविषयी बैठक झाली. यंदा परवानगी देण्याची अग्रही मागणी होती. मात्र यंदाही कोरोनाचे संकट गंभीर असल्याने आम्ही त्यांना सर्व बाबी समजून सांगितल्या व मंत्री मंडळाने काही बदल करुन निर्णय घेतले आहेत.
आषाढीसाठी असलेल्या प्रमुख दहा मानाच्या महत्वाच्या पालख्यांना आषाढी वारीला जाण्याला परवानगी दिली. गेल्यावर्षी दहा मानाच्या पालख्यांना प्रत्येकी प्रस्थान सोहळ्या करिता 20 वाऱ्यांना उपस्थितीची परवानगी दिली होती. यावेळी देहू येथील संत तुकाराम महाराज व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाकरिता 100 लोकांना परवानगी लोकांना उर्वरित आठ मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येक 50 लोकांना परवानगी दिली आहे. हे तेथील कार्यक्रमासाठी आहे. हे लोक पालखी घेऊन चालत जाणार नाहीत.
मागील वेळी प्रत्येक एक एसटी दिली होती. यावेळी प्रत्येकी दोन एसटी गाड्या द्यायचे ठरले आहे. मानाच्या पालखी सोहळ्याचा पंढरपुर येथील मुक्काम व कालावधी दशमी दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान होण्याचे प्रस्थावीत केलेले आहे. पालख्याची वाहने वाखरी येथे पोचल्या नंतर तेथून पंढरपुरकडे दिड किलोमीटर अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्याला मान्यता दिली आहे. दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यासाठी अजून मंदिर समितीकडून अहवाल नाही, त्यामुळे त्याबाबत सध्या तरी सरकारने जारी केलेले नियम लागू असतील.
शासकीय महापुजा गतवर्षीप्रमाणे होईल. विठ्ठलास संताच्या भेटी पाच भाविकांना सोडले जाईल. भाविकांसाठी दर्शन बंदच राहणार आहे. विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक सोळा लोक सहभागी असतील. हा सोहळा साध्या पद्धतीत असेल. महाद्वार काल्यात सहभागासाठी आकरा लोक असतील. त्या लोकांची वैद्यकीयतपासणी असेल. दिंडी प्रदक्षिणेला केवळ पाच लोक असतील. नामदेव महाराज समाधी सोहळ्यात आकरा व्यक्ती असतील.
हे ही वाचा ः
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?समग्र शिक्षा हे केंद्र शासनाची शिक्षण विभागात चालणारी महत्त्वपूर्ण योजना असून या मार्फत अनेक उपक्रम चालतात सदरील योजना अंमलबजावणीसाठी विविध…
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागाभारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज…
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणामुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान…
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनेक…