Sarthi Meeting |सारथी संस्थेला पूर्णतः स्वायत्तता, अजित पवार सोबत बैठकीत बहुतांश प्रमुख मागण्या मान्य.
राज्यात सारथीची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली असून कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांना या बैठकीत निर्देश दिले.
प्रमुख शैक्षणिक शहरांच्या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून वसतीगृह उभारणी, सारथीमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा, प्रशिक्षण, संशोधन यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची मागणी आपण मान्य करून घेतली.
सारथी लाभार्थी साठी उत्पन्न मर्यादा ८ लाख असून त्यात १ लाखाच्या आत ,३ लाखाच्या आत, ३ ते ५ लाखाच्या आत व ५ ते ८ लाखाच्या आत असे टप्पे तयार करून अभ्यासक्रम निहाय सारथी कडून देण्यात येणारे विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येईल, जेणेकरून जास्तीतजास्त गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल, यादृष्टीने निर्णय घेण्यात आला.
सारथी प्रशासनासाठी आवश्यक असणारी पदे तात्काळ भरण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. तसेच, तारादूत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
याचबरोबर, सारथीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाची छपाई करून त्याचे तात्काळ वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपण मागणी केलेल्या १००० कोटी रूपयांच्या निधीबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन २० दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याचबरोबर, समाजाच्या वतीने मी मांडलेल्या सूचनांनुसार सारथीसंबंधीत इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करावी, या मागणीसही सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले.
- Coronation of Shivaji Maharaj |या कारणामुळे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करावा लागलाछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक: स्वराज्याचा पाया Crown ceremony of Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक (कोरोनेशन)
- मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तरमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लागू करण्यासाठी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी, सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी तसेच
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय
- बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवालबीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या