छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर मध्ये राडा, अनेक वाहनांची जाळपोळ, शहरात तणावाचे वातावरण

किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. Riot-like incidents in Chhatrapati Sambhajinagar, burning of many vehicles, atmosphere of tension in the city

सदरील प्रकरणावरून शहारत तणावपुर्ण शांतता आहे. पोलीस प्रशासन सतर्क असुन बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. सदरील दोन गटातील काही सामाजिक अतात्किव घटक समाजातील अशांतता किरकोळ वादवरुन बिघडवणारी असतील अशा लोकांना कठोर शासन करुन जरब बसविणे आवश्यक आहे. अशी समाज मध्यामावर जनमानसातील चर्चा ऐकवयास मिळत आहे.

सदरील घटनेची माहिती पालकमंत्री यांनी पोलिस प्रशासनाचा आढवा घेऊन शासनास कळविले. पालक मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, रात्री दोन गटात राडा झाला. यावेळी गाड्या जाळण्यात आल्या त्यात पोलिसांच्या वाहनांचा देखील त्यात समावेश होता. दगडफेकसुद्धा झाली. ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.पवित्र रमजानचा महिना आणि रामनवमी आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता पाळावी. संभाजीनगरमधील राड्याच्या तपासासाठी १० पधके तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये किऱ्हाडपुरा भागात राडा झालेल्या ठिकाणी पालकमंत्री संदिपान भुमरे दाखल झाले आहेत. राडा झालेल्या ठिकाणाची भुमरे माहिती घेणार आहेत. याप्रकरणी संदिपान भुमरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणार आहेत.

आज दोन्ही धर्माचे महत्त्वाचे रामनवमी व रमजान उत्सव चालू असून शहरात अशी अशांतता अयोग्य असल्याचे बोलले जात आहे. Riot-like incidents in Chhatrapati Sambhajinagar, burning of many vehicles, atmosphere of tension in the city

<

Related posts

Leave a Comment