जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

जैशी करणी वैशी भरणी – मराठा आरक्षण विरोधी गुणरत्न सदावर्तेची वकिली सनद रद्द

Adv Gunaratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द करण्यात आली आहे. वकिली गणवेशात आंदोलन केल्यामुळे डॉ. सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिलकडे तक्रार केली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून रद्द

या तक्रारीची दखल घेत कारवाई झाली असून सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यापुढे 2 वर्षासाठी कोणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.

बार कौन्सिलच्या नियमानुसार वकिलीचा गणवेश परिधान करून सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत सुनावणी झाल्यानंतर आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. इतकेच काय गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते.

आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

adv gunaratna sadavarte : Adv. Gunaratna Sadavarte’s charter has been revoked by Maharashtra and Goa Bar Council for 2 years. Dr. due to agitation in lawyer’s uniform. Sushil Mancharkar had complained to the Bar Council. Taking cognizance of this complaint, action has been taken and Sadavarte’s charter has been canceled for 2 years. This action has been taken against Gunaratna Sadavarte for violating the rules of the Bar Council. Adv. Gunaratna Sadavarte will no longer be able to advocate for anyone for 2 years.

As per the rules of the Bar Council, it is prohibited to wear advocate’s uniform and go to public places. Sadavarte met the protesting employees at Azad Maidan after hearing about the ST employees. Gunaratna Sadavarte was spotted dancing at the venue even though he was wearing uniform. After the violation at Azad Maidan was noticed by lawyer Sushil Mancharkar, he complained directly to the Bar Council. Taking cognizance of this complaint, Gunaratna Sadavarte was prosecuted by the Bar Council for violating the rules

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice