कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉस मराठी शोमध्ये भाग घेतल्यामुळे झाल्या ट्रोल

कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉस मराठी शोमध्ये भाग घेतल्यामुळे झाल्या ट्रोल

मुंबई : बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन गेल्या रविवारी सुरू झाला आणि घरात प्रवेश केलेल्या संपूर्ण सेलिब्रिटींमध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील देखील होते. तथापि, पाटील यांना तीव्र ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे, अनेकांनी असे म्हटले आहे की तिच्यासारख्या व्यक्तीने शोमध्ये भाग घेण्यासाठी हो म्हणू नये. लोकांनी तिच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत, तर बिग बॉस हाऊसमधील तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात झाली. या कार्यक्रमात टिकून राहण्यासाठी स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करू लागले आहेत. दुसऱ्या स्पर्धकावर मात करत स्वतःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी राजकारणही सुरू झाले आहे. कार्यक्रमातील स्पर्धकांचा खेळ पाहून मूळची कीर्तनकार असलेली शिवलीला पाटील भांबावून गेली. तिने आपल्या मनाची ही अवस्था दुसरी स्पर्धक मिनल शाहकडे व्यक्त केली. ते सांगतान शिवलीला पाटील हिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. Bigg Boss Marathi 3: Shivlila Patil Kirtankar Trolled for Participating in Show

काय म्हणाली शिवलीला
बिग बॉस मराठी ३ च्या घरात प्रत्येक स्पर्धकाला टिकून राहण्यासाठी वेगवेगळे टास्क दिले जात आहेत. या टास्कमध्ये स्पर्धक ज्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करतील त्यानुसार आणि इतर स्पर्धकांना स्वतःची उपयुक्तता पटवून कसे देतात यावर त्यांचे घरात टिकून राहणे अवलंबून राहणार आहे. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची धडपड सुरू झाली आहे. एकमेकांना शह काटशह देत स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करत आहेत. Bigg Boss Marathi 3: Shivlila Patil Kirtankar Trolled for Participating in Show

हे करत असताना चेहऱ्यावर एक भाव आणि मनात वेगळाच विचार अशा पद्धतीने सगळेजण वागत आहेत. हे सगळे बघून तरुण कीर्तनकार शिवलीला चांगलीच भांबावून गेली. इतकेच नाही तर आपण या सर्वांसमोर कसे टिकून राहणार अशी चिंताही तिला एकीकडे सतावत आहे. तर दुसरीकडे आपल्याला ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी ३ च्या घरात वागत आहोत ते पाहून आपल्या घरच्यांना विशेष करून आईला काय वाटत असेल, असा विचार सतत तिच्या मनात येत आहे. Bigg Boss Marathi 3: Shivlila Patil Kirtankar Trolled for Participating in Show

शिवलीलाने तिच्या मनातील सर्व विचार दुसरी स्पर्धक मीनल शाह हिच्याकडे व्यक्त केले. हे सांगताना मीनल तिला सांगते, ‘तू अजिबात काळजी करू नकोस. तू खूप चांगली खेळत आहेस. भले आपल्या दोघींचे फारसे बोलणे होत नाही. पण तरीसुद्धा तू जे काही खेळत आहे ते कौतुकास्पद आहे. तुला कधीही माझी मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे. हे लक्षात ठेव.’ मीनलाच्या या आश्वासक बोलण्याने शिवलीला अधिकच भावुक होते आणि तिला मिठी मारून रडू लागते. त्याचवेळी विशाल तिथून जात असताना शिवलीलाला विचारतो,’माऊली, काय झालं तुम्हांला तुम्ही का रडताय. तुम्ही काहीही काळजी करून नका. टेन्शन न घेता खेळा.’

कोण आहे शिवलीला पाटील
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील हिचे गाव आहे. सोशल मीडियावर ज्यांची कीर्तने प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटीलचे नाव घेतले जाते. शिवलीलाच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करते.

शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच तिला कीर्तनाचे बाळकडू मिळाले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलिला कीर्तन करू लागली. त्यानंतर तिने अनेक गावांत कीर्तने केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. Bigg Boss Marathi 3: Shivlila Patil Kirtankar Trolled for Participating in Show

<

Related posts

Leave a Comment