दुर्मीळ रानभाज्या महोत्सव, वाघाटे पासून कुर्डू पर्यंतच्या रानभाज्यांनी वेधले लक्ष

दुर्मीळ रानभाज्या महोत्सव, वाघाटे पासून कुर्डू पर्यंतच्या रानभाज्यांनी वेधले लक्ष

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त जिल्हाीधिकारी कार्यालय परीसरात आज आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे व बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाघ परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पदिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची उपस्थिती होती.एरवी दुर्मीळ असलेल्या रानभाज्यातील कुरडूपासून वाघाटेपर्यंतच्या रानभाज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, जंगल, जमीन यातील जैवविविधतेला जपत आदिवासी बांधवांनी रानभाज्याचे महत्व आणि त्यातील आयुर्वेदिक तत्व जपून ठेवले आहे. Inauguration of Ranbhaji Mahotsav held today at District Collector’s Office premises on the occasion of World Tribal Day

आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी महोत्सवात श्रावणात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश रानभाज्या येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. यात प्रामुख्याने कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्याा व सेंद्रीय हिरव्या भाज्याु, फळभाज्याळ व फूलभाज्याण व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्पाीदीत केलेला माल, सेंद्रीय उत्पाहदने, गुळ, हळद, लाकडी घाण्या चे करडीचे तेल, गहू, सर्व डाळी व भुईमुगाच्याी शेंगा, मुगाच्यास शेंगा व केळीचे वेफर्सचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.मानवी आरोग्याुमध्येु सकस अन्नााचे अनन्यीसाधारण महत्व आहे. सकस अन्नारमध्येड विविध भाज्यां चा समावेश होतो. Inauguration of Ranbhaji Mahotsav held today at District Collector’s Office premises on the occasion of World Tribal Day

सध्यााच्या परिस्थितीमध्येु रानातील म्हाणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्याध उगवल्याि जाणाऱ्या रानभाज्या्, रानफळांचे महत्वे व आरोग्यजविषयक माहिती सर्वसामान्यन नागरिकांना होणे आवश्यधक आहे. रानभाज्यांेचा समावेश हा त्यात-त्या् भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो. रानभाज्यां मध्ये. विविध प्रकारचे शरीराला आवश्य्क असणारे पौष्टिक अन्नयघटक असतात. Inauguration of Ranbhaji Mahotsav held today at District Collector’s Office premises on the occasion of World Tribal Day

या रानभाज्याी नैसर्गिकरित्या येत असल्याचमुळे त्याकवर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्याशत येत नाही. त्याेमुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असतात. यात शेतकरीगट व महिलागटांचा सक्रिया सहभाग आहे. हा महोत्सव सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरु राहणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. Inauguration of Ranbhaji Mahotsav held today at District Collector’s Office premises on the occasion of World Tribal Day

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice