पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान राजीव सातव यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी राजीव सातव यांची ओळख होती. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली.
Related posts
-
खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक
मुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’ अशा शब्दांत... -
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?
बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जवळचे... -
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडली
बीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ...