महाराष्ट्र

Omicron | महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, या ठिकाणी आढळला पहिला पॉझिटिव्ह

मुंबई : ज्याची भिती होती, अखेर तेच झालंय. राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron variant) शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivali) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा पॉझिटिव्ह रुग्णाला प्रवासाचा इतिहास होता. ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून हा रुग्ण आला होता. (Omicron in mumbai Man returned from foreign country tested Omicron positive in Kalyan Dombivali maharashtra new variant of coronavirus)

हा पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्णाचं वय हे 33 वर्ष आहे. या व्यक्तीने दक्षिण आफ्रिका, दिल्ली आणि मुंबई असा प्रवास केला होता. दरम्यान कल्याण डोंबिवलीत सापडल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. तसेच आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतला नव्हता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या सर्वांची निगेटिव्ह आली आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आणखी कोणी आलं होतं का, याचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.  

बीबीसीच्या अहवालानुसार, डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी दक्षिण आफ्रिकेतील पहिले ओमिक्रॉन प्रकार ओळखले आहे. त्या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षाही आहेत. एएफपीशी केलेल्या संभाषणादरम्यान, त्याने सांगितले की त्यांना प्रथम 30 वर्षांच्या तरुणामध्ये याची लक्षणे दिसली. त्या तरुणाला खूप थकल्यासारखे वाटणे, सौम्य डोकेदुखी, संपूर्ण शरीर वेदना, घसा खवखवणे, कोरडा खोकला अशी लक्षणं दिसत होती.

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये अत्यंत थकवा, स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला अशी लक्षणे आढळून आली. तर काही रुग्णांना काही प्रमाणात ताप देखील होता. डॉक्टरांनी ही लक्षणे रुग्णांच्या लहान गटाला पाहिल्यानंतर सांगितली असली तरी. ओमिक्रॉनची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसतात की नाही याबाबत आताच स्पष्ट दावा करता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 5
  • Today's page views: : 5
  • Total visitors : 504,602
  • Total page views: 531,361
Site Statistics
  • Today's visitors: 5
  • Today's page views: : 5
  • Total visitors : 504,602
  • Total page views: 531,361
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice