राज ठाकरे प्रबोधनकारांच्या कुळाचे की पुरंदरेच्या गोत्राचे वाचा सविस्तर

राज ठाकरे प्रबोधनकारांच्या  कुळाचे की पुरंदरेच्या गोत्राचे वाचा सविस्तर

वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता .कळस म्हणजे कायस्थांचे बीजकुळ हीन ठरवत त्यांना अनौरस ठरवणारे घाणेरडे आरोप केले होते. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांनी 1918 साली “कोदंडाचा टणत्कार ” हे पुस्तक लिहून जबरदस्त प्रत्युत्तर दिले होते . Prabodhankar’s clan or Purandare’s clan?


शिवरायांच्या तलवारी प्रमाणे शब्द चालवुन प्रबोधनकारांनी राजवाड्यांच्या जातीय व खोट्या इतिहासाचे तुकडे तुकडे केले होते. “पिसाळलेले कुत्रे एकाला चावले की पुढे शेकडो जणांना डसल्याशिवाय राहत नाही .त्याची कवटी फोडून त्याला मोक्षच द्यावा लागतो .” हा प्रबोधनकारांचा ठाकरी बाणा होता. राजवाड्यांचे सर्व आरोप सत्य ऐतिहासिक पुराव्यांनी खोडून कायस्थ समाजावरील खोटा कलंक दूर केला होता .तेंव्हापासून राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकारांना “कोदंड” म्हणूनच हाक मारत असत. Prabodhankar’s kul or Purandare’s gotra ?

प्रबोधनकार हे शिव कुळाचे वारसदार होते .त्यांचे शब्द अनुबॉमपेक्षाही शक्तिशाली व खोट्या चा नायनाट करणारे होते वआहेत .माननीय राज ठाकरे यांना प्रबोधनकारांच्या कुळापेक्षा पुरंदरे यांचे गोत्र अधिक जवळचे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे .टिळक -सावरकर -राजवाडे- गोडसे -पुरंदरे -भागवत यांचे गोत्र एक असू शकते .ठाकरे यांचे नाते कुळांशी आहे .गोत्रांशी नाही. राजकीय अभिनिवेषातून भोंग्यांची चढ-उतार करताना कुळालाच कलंक लावणे म्हणजे प्रबोधनकारांना खोटे ठरवणे आहे.

सूर्य केवळ आमच्यामुळे चमकतो व दिसतो ,असं म्हणणारे करोडो जीवजंतू सृष्टीत आहेत .परंतु सूर्यामुळे जीवजंतू व सृष्टीचे अस्तित्व आहे ,हे त्रिवार सत्य आहे .असा महाप्रतापी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! घुबडांनी सूर्य पाहिल्याची मर्दानगी सांगू नये .!! Prabodhankar’s kul or Purandare’s gotra ?


पुरंदरे यांनी लिहिलेल्या बनावट इतिहासाची चिरफाड डॉक्टर आ.ह.साळुंखे सरांनी “पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर “या ग्रंथात सप्रमाण केलेली आहे .हे पुस्तक वाचल्यावरही पुरंदरेनी शिवचरित्र घराघरात पोहोचवले असे वाटत असेल तर त्यांच्या मेंदूला रेशीम बागेचा विषाणू चावला असे समजावे . Prabodhankar’s kul or Purandare’s gotra ?

मराठा सेवा संघ .संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र व देशात समता ,बंधुता व न्यायाचे विचारकार्य १९९० पासुन करते.पुरुषोत्तम खेडेकरांनी कुणबी -मराठा ,बहुजनांना हा वारसा दिला.यामुळे जात -धर्मवादी भोंग्यांना प्रबोधित समाज भिक घालत नाही. राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड “बी “ग्रेड आहे की ” सी ” ग्रेड हे शोधण्यापेक्षा त्यांच्या मिमिक्रीला लोकांनी कोनता ग्रेड दिला आहे , याचा शोध घ्यावा . ब्रिगेड समाजातली ए टू झेड विषमता संपावी यासाठी प्रयत्नरत आहे .तसेही माननीय राजसाहेब ; आपल्या प्रत्येक भाषणात आपण ब्रिगेडची आवर्जून आठवण काढताच या एकतर्फी प्रेमाबद्दल व आठवण काढल्याबद्दल आभार व धन्यवाद .माणूस मेल्यावर आठवणी शिल्लक राहतात; ब्रिगेड तर विचार आहे तो संपणार नाही .सतत मालक बदलून, मालकांच्या इशाऱ्यावर भोंगे वाजवणारी ब्रिगेड नाही .शिवराय ,फुले ,शाहू ,आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या विचारावर चालणारी प्रबोधन चळवळ आहे ब्रिगेड!! Prabodhankar’s kul or Purandare’s gotra ?


माननीय राज साहेब वेडेवाकडे का होईना आपण ब्रिगेडचे नाव घेता. वाल्ल्या सुद्धा सुरुवातीला मरा मराच म्हणत होता .परंतु शेवटी त्याला राम कळलाच .आपल्यालाही खरी ब्रिगेड निश्चितच कळेल . माननीय बाळासाहेब ठाकरे यांना ही चळवळ माहीत होती .त्यामुळे त्यांनी मराठा सेवा संघ व ब्रिगेडला कधीच विरोध केला नाही . मनोहर जोशींना सांगून सामाजिक प्रश्नांबाबत सहकार्य करायला लावले. अनेकदा त्यांच्या विरोधात ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली परंतु हा विरोध त्यांनी सकारात्मक घेतला .आर एस एस ला ते ओळखुन होते.
आपली ही सध्याची भोंग्यांची चढ-उतार करण्याची “ऑर्डर” संपली की वेळ काढावा व ब्रिगेड समजून घ्यावी .ही विनंती .शिव कुळाच्या वारसांनी पेशवाईचा अभिमान बाळगणे बरे नव्हे .प्रबोधनकारांना काय वाटेल?? आपसात नव्हे तर मानवतेच्या शत्रू विरोधात लढण्याची ही वेळ आहे. आमचे ,प्रबोधनकारांचे व सर्व बहुजनांचे कुळ म्हणजे शिव कुळ !!
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरिक वाटे देवा।।
जय जिजाऊ.
@गंगाधर बनबरे, संभाजी ब्रिगेड.

==============

<

Related posts

Leave a Comment