अमोल मिटकरीच्या वादग्रस्त वक्तव्याने राष्ट्रवादीची अडचण; मिटकरीचा माफी मागण्यास नकार, मात्र जयंत पाटलांची दिलगिरी

अमोल मिटकरीच्या वादग्रस्त वक्तव्याने राष्ट्रवादीची अडचण; मिटकरीचा माफी मागण्यास नकार, मात्र जयंत पाटलांची दिलगिरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेमध्ये केलेल्या विधानावरून Amol Mitkari’s controversial statement on Brahman सध्या बराच वाद सुरू झाला आहे. ब्राह्मण महासंघानं अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्या माफीची मागणी केली आहे. (NCP’s problem with Amol Mitkari’s controversial statement; Mitkari refuses to apologize, but Jayant Patil apologizes)

त्यातच आज ब्राह्मण महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयासमोर आंदोलन केलं. भाजपानं देखील यासंदर्भात टीकेचा सूर लावला असताना अमोल मिटकरी यांनी मात्र आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झालं, असं म्हणत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. NCP’s problem with Amol Mitkari’s controversial statement; Mitkari refuses to apologize, but Jayant Patil apologizes

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले होते. Amol Mitkari’s controversial statement on Brahman

मिटकरी आपल्या भूमिकेवर ठाम

मिटकरींच्या या विधानावर ब्राह्मण वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना त्यांनी मात्र त्यावर माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. “ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये” Amol Mitkari’s controversial statement on Brahman

या सर्व प्रकरणावर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. “अमोल मिटकरींच्या विधानामध्ये बरेच विनोद होते. पोट धरून बरेच लोक हसत होते. त्यावेळी लग्नविधीदरम्यानच्या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. त्यांची ती मतं असतील”, असं जयंत पाटील म्हणाले. (NCP’s problem with Amol Mitkari’s controversial statement; Mitkari refuses to apologize, but Jayant Patil apologizes) Amol Mitkari’s controversial statement on Brahman

Amol Mitkari’s controversial statement on Brahman

=====================

<

Related posts

Leave a Comment