कोण आहेत नवनीत राणा? मॉडलिंग ते राजकारणातील नवनीत यांचा प्रवास

कोण आहेत नवनीत राणा? मॉडलिंग ते राजकारणातील नवनीत यांचा प्रवास


नागपूर : नवनीत राणा यांचे बालपण मुंबईत गेले. नवनीत यांचे आई-वडील हे पंजाबी (Punjabi) आहेत. त्यांची लुभाना ही जात आहे. नवनीत यांचे वडील सेनेत अधिकारी होते. बारावीनंतरच त्यांनी मॉडलिंगमध्ये (modeling) प्रवेश केला. कन्नड चित्रपटातून (Kannada films) आपल्या करिअरची सुरवात केली. याशिवाय त्यांनी तेलगू चित्रपट सीनू, वसंथी आणि लक्ष्मी (2004) मध्येही अभियन केलाय. रवी राणा आणि नवनीत राणा यांचं लग्न 2011 मध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाले. त्यावेळी रवी राणा हे बडनेराचे आमदार होते. तीन हजार शंभर जोडप्यांचं लग्न त्यावेळी लागलं होतं. त्यात राणा दाम्पत्य होतं. त्यांच्या लग्नात रामदेवबाबा तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते. लग्नानंतर त्या अभिनय सोडून राजकारणात सक्रिय झाल्या. (Who is Navneet Rana? Navneet’s journey from modeling to politics)

आनंदराव अडसुळांचा पराभव करून राजकारणात

2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण, त्यावेळी त्या पराभूत झाल्या. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात त्या निवडणुकीत उभ्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार मतांनी पराभव केला. त्यात त्या अमरावती लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्या. 2019 च्या निवडणुकीत अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती. नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला. दोन लाख रुपयांचा दंडही न्यायालयानं ठोठावला होता. अमरावतीतून अर्ज भरताना त्यांना मोची (चर्मकार) जातीचं प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढविली होती. (Who is Navneet Rana? Navneet’s journey from modeling to politics)

शिवसेनेवर गंभीर आरोप

मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता मी मुंबईची लेक आहे. अमरावतीची सून आहे. राज्यात शासनव्यवस्था ढासळली आहे. याला मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. त्यांनी हनुमान चालीसा म्हणून राज्यावरील संकट दूर करावं, अशी आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री हनुमान चालीसा म्हणत नसतील तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणू यासाठी त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळं नवनीत राणा या चर्चेत आहेत. (Who is Navneet Rana? Navneet’s journey from modeling to politics)

महत्वाच्या बातम्या

<

Related posts

Leave a Comment