राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. कारण राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती (Police Recruitment) निघणार आहे. त्यासाठीच्या हलचाली गृह विभागाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा (Police Bharti 2022) मार्ग आखेर मोकळा झाल्याने युवकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. Police recruitment of 7,000 posts in the Maharashtra state soon
त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी (Job) देणारी ही भरती असणार आहे. विविध कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती ही झाली नव्हती. त्यामुळे अनेकांना या संधीची प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठीच भरती
ही भरती प्रक्रिया ही केवळ पोलीस कॉन्टेबल या पदासाठी पार पडणार आहे. एक ते दीड महिन्यात ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकार आणखी एका मोठ्या भरतीच्या तयारीत असल्याची माहितीही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच पाच हजार पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती.
त्यानंतर आता हा दुसरा टप्पा हा सात हजारांचा असणार आहे. तर तिसरा टप्पा हा दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पुढील काही दिवस हे चांगले असणार आहेत. त्यांना भरतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. Police recruitment of 7,000 posts in the Maharashtra state soon
बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा
गेल्या दोन वर्षा कोरोनामुळे भरती प्रक्रिया ही मंदावली होती. कोरोनाचा कहर वाढल्याने अनेकदा पोलीस भरतीच्या तारखा पुढेही ढकलण्यात आल्या होत्या. तसेच कोरोनात अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेक उद्योगधंदे देशोधडीला लागल्याने अनेक तरुणांवर बेरोजगारीची वेळ आलीय. हाताला काम नसणाऱ्या तरुणांची सख्या राज्यात सध्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली होती. Police recruitment of 7,000 posts in the Maharashtra state soon
त्या तरुणांना आता ही आनंदवार्त सुखावणारी आहे. त्यांचे भरती होण्याच स्वप्न सत्यात उतरण्यास या भरतीने मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता तरुणांकडून तयारी आणखी जोमाने करण्यात येत आहे. या भरतीसाठी हजारो तरुण अर्ज करण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यभरात ही भरती प्रक्रिया राबली जाणार आहे.
Police recruitment of 7,000 posts in the Maharashtra state soon
हे ही वाचा========
- Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचामुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर…
- महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील…
- राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळभारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा…
- Trigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?आयटी कंपन्यांसह कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली…
- महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागाराज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी…