Pandharpur Ashadi Wari 2021 | प्रत्येक पालखीत ११ वारकऱ्यांना परवानगी द्या – राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद

Pandharpur Ashadi Wari 2021 | प्रत्येक पालखीत ११ वारकऱ्यांना परवानगी द्या – राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद

आषाढी वारी Pandharpur Ashadi Wari 2021 म्हणजे वारकरी संप्रदायासाठी कुंभ प्रवणी असते. वशं परंपरागत चाललेली ही परंपरा जागतिक कोरोना आजारामुळे मागच्या वर्षी पासून या आषाढी वारी संकट आले आहे. महाराष्ट्रसह देशभरातील वारकरी संप्रदाय, विठ्ठल भक्त पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागेचत स्नान करुन आपल्या आरध्य देवाचे दर्शन घेऊ शकत नाहीत. सदरील परंपरा संकटात सापडली आहे.

Pandharpur Ashadi Wari 2021 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही विठुरायाचं मंदीर भाविकांसाठी बंदच असणार आहे. तसेच सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा.


या परस्थिती समजाला दिशा देणारा वारकरी संप्रदाय प्रशासनाला उत्तम सहकार्य केले आहे. यापुढेही प्रशासनाला सहकार्य करत राहिल. परंतु संप्रदायाच्या किंवा वारकऱ्यांच्या भावना प्रशासनाने समजून घ्याव्यात. लाखो स्वरूपात वाळवंटात भरणारा वैष्णवाचा मेळा न भरवत केवळ परंपरा टिकावी म्हणून महाराष्ट्रातुन येणाऱ्या दिंड्याच्या बाबतीत कोविड नियम पाळून त्या पार्श्वभूमीवर आम्ही खालील मागण्या मांडत आहोत. त्यानुसार आम्हाला परवानगी द्यावी.

पंढरपूरच्या आषाढी पायी वारीत
प्रत्येक पालखीत ११ वारकऱ्यांना
परवानगी देणे, मंदिरे खुले करणे, किर्तन व भजन करण्यास परवानगी देणे
यासाठी आज नांदेड येथील
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर साहेब यांना
निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेचे जिल्हा सचिव ह.भ.प. अरविंद महाराज सोनखेडकर, रंगनाथ महाराज ताटे, सदाशिव पवळे, साहेबराव महाराज पांचाळ, भास्कर साधु महाराज कंधारकर आदींची उपस्थिती होती.

हे वाचा

<

Related posts

Leave a Comment