महाराष्ट्र शासनाच्या एच एल एल प्रयोगशाळा चालवणाऱ्या महाल्याब कंपनी कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी निवेदन.

महाराष्ट्र शासनाच्या एच एल एल प्रयोगशाळा चालवणाऱ्या महाल्याब कंपनी कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी निवेदन.

Statement for pay hike of Mahalyab Company employees running HLL Laboratory, Government of Maharashtra.


ता. प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा HLL अर्थात महाल्याब या कंपनीला संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाचे टेंडर गेल्या पाच वर्षा आधी दिले गेले होते तेंव्हा पासून आज पर्यंत किनवट महाल्याब अंतर्गत येणारे जवळपास तीस कर्मचारी येतात या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर व कोरनो सारख्या भयंकर महामारीत सुद्धा हे आरोग्य विभागतील कर्मचारी यांनी काम केले आहे.

तरी सुद्धा पगार मात्र खूपच कमी असल्यामुळे त्यांनी आज हिंदल्याब किनवट येथे जाऊन ल्याब म्यॅनेजर व्यंकट तोटावार यांना पगार वाढ संबधी प्राथमिक निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या प्रसंगी ल्याब चे टेक्निश्यन बालाजी सिरसाट, आशिष राठोड हे उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षा पासून सहा किंवा साथ हजार रुपयावर काम करीत असून किमान पगार पंधरा ते बारा हजार देण्यात यावे अशा मांगणी चे निवेदन देण्यात आले येणाऱ्या एका महिन्यात पगार वाढ झाली नाही तर काम बंद आंदोलन करू असे ही सांगण्यात आले.


यावेळी निवेदनावर प्रतिभा आडे, मंगेश जाधव, समाधान उटकर, ओंकार इंगळे,दत्ता हिंगाडे,शुभम कलाने, राजकुमार सरपील्लेवार, विक्रम गेडाम,महेश देशमुख,नरेंद्र बंडेवार, लक्ष्मण आत्रम, पंकज राठोड,ज्ञानेश्वर खुडे,वंदना डवरे,भारत राठोड,बाळू देशमुख इत्यादी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

÷÷÷=============÷÷÷

<

Related posts

Leave a Comment