NCP Split| Ajit Pawar Rebel News| राष्ट्रवादीत पुतण्या काकाला भारी; अजित पवार बाजी मारणार?

NCP Split| Ajit Pawar Rebel News| राष्ट्रवादीत पुतण्या काकाला भारी; अजित पवार बाजी मारणार?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार गटाची बैठक होणार आहे. दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NCP Split | Ajit Pawar News | Rashtravadi Putanya Kakala Bhari; Ajit Pawar will win? Sharad Pawar Calls Big Meeting in mumbai after ajit pawar rebel marathi news

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटाने दावा केला होता की पाच तारखेला कोणता गट सरस हे लवकरच कळेल आणि कोणते आमदार कोणत्या गटाकडे आहेत हे लवकरच दिसेल. आज पुतण्या काकाला भारी पडणार का? काकांचा अनुभवी डाव पुतण्याला रोखण्यात यशस्वी होईल? हे नक्कीच कळल.

सामान्य जनतेत जन माणसात चर्चा आहे की अजित पवार यांनी सर्व तयारी करूनच भाजपकडे गेल्याचा सांगण्यात येत आहे. 44 आमदारांच्या प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन ते 44 आमदार आपल्याशीच इमान कसे ठेवतील याची सर्व तजवीज करून. तसेच विधान परिषदेचे दोन आमदार आपल्याशीच कसे इमान राखतील याचीही तजवीज करूनच अजित पवार यांनी भाजपचे संधान बांधल्याचं कळतंय.

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांची बैठक वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीला कोणकोण आमदार आणि खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचा आजच मेळावा होणार आहे. अजित पवार गटाचा मेळावा भुजबळ सीटीला होणार आहे.

<

Related posts

Leave a Comment