Monsoon News| पुढील 48 तासांत मान्सूनचा वेग वाढणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

Monsoon News| पुढील 48 तासांत मान्सूनचा वेग वाढणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

मुंबई : मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या (Monsoon) वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुढील 48 तासांमध्ये मान्सूनचा वेग वाढणार आहे. मान्सूनने अंदबार (Andabar), निकोबार व्यापल्यानंतर त्याची वाटचाल संथ झाली होती. मान्सून अरबी समुद्रात (Arabian Sea) अडकला होता. मात्र पुढील 48 तासांमध्ये मान्सूसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून, मान्सूनचा वेग वाढणार आहे. मात्र मान्सूसची वाटचाल संथ झाल्याने त्याचा पुढील प्रवास देखील लांबला आहे.

राज्याच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. मात्र हा मान्सूचा पाऊस नसून अवकाळी पाऊस असल्याचे देखील हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे जमीनीच्या मशागतींना वेग आला असून, शेतकरी पेरणीपूर्व कामाला लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसाचा इशारा

मान्सूचा प्रवास लांबला आहे. मान्सूचा प्रवास जरी लांबला असला तरी देखील राज्याच्या काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे, तर काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. दरम्यान हा मान्सूचा पाऊस नसून मान्सूनपूर्ण पाऊस असल्याचे हवामान खात्याकडू स्पष्ट करण्यात आले आहे.

पुढील तीन दिवस राज्यात वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यात आहे. कोकण आणि गोव्यात येत्या 28 मे पर्यंत काही भागात तुरळक तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सूनपूर्व  मशागतीला वेग

दरम्यान सध्या राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. पाऊस पडल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून, शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान अद्याप मान्सून राज्यात दाखल झाला नसून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीतज्ज्ञाकडून देण्यात येत आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेवटच्या टप्प्यातील अंबा पिकाला बसल्याचे पहायला मिळत आहे.

हे ही वाचा ——–

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice