कोल्हापुर ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन झाले. अंदोलनात कोल्हापुरचे पालकमंत्री बंटी पाटील, बहुजन वंचित आघाडीचेे नेते माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह कोल्हापुर जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आ राज्यभरातून मराठा समाजाचे लोक सहभागी झाले आहेत. कोल्हापुरात मराठा समाजाचा एल्गार सुरु झाला असून मराठा एकवटला असल्याचे पहायला मिळत आहे. श्रीमंत मालोजीराजे भोसलेही अंदोलनस्थळी आले आहेत. आजच्या बुधवारच्या मुक अंदोलनानंतर पुढील अंदोलनाची दिशा काय असेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आरक्षण भूमी
कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. याच भूमीतून देशातील आरक्षणाची बीजं रोवली गेली. वेदोक्त प्रकरणानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाचा आदेश काढला. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झाली. शाहू महाराजांची आठरापगड जातींना आरक्षण देऊन मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. रिक्त झालेल्या जागांपैकी शेकडा 50 जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा 50 पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी, असं या आदेशात म्हटलं होतं. मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पार्शी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी कोल्हापूरची निवड केली आहे. तसेच कोल्हापुरातच शाहू महाराज यांची समाधी आहे. त्यामुळेही संभाजीराजे यांनी या ऐतिहासिक स्थळाची निवड केली.
पुरोगामी आंदोलनाची भूमी
छत्रपती शाहू महाराज यांचा संपन्न वारसा राहिलेला कोल्हापूर पुरोगामी चळवळीचं केंद्रं मानलं जातं. कोल्हापुरातून अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनं झाली आहे. कोल्हापुराने महाराष्ट्राला दिशा देण्याचं कामही केलं आहे. सत्यशोधक चळवळ, प्रजापरिषद चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी कामगार चळवळ आणि डावी चळवळ आदी चळवळींचं कोल्हापूर हे केंद्र राहिलं आहे. सामाजिक न्यायाची बीजं रोवणारं शहर म्हणूनही कोल्हापूरकडे पाहिलं जातं. त्यामुळेही संभाजी छत्रपती यांनी कोल्हापूरची निवड केल्याचं सांगितलं जातं.
मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. राज्य सरकारने न्यायालयात भूमिका चांगली मांडली नसल्याने हे आरक्षण रद्द झाले असल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. काहीही झाले तरी मराठा समाजातील गरिब कुटुंबातील तरुण आरक्षणापासून वंचित राहु नये यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यात अंदोलन पुकारले आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या अंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. कोण कोणत्या पक्षाचा हा विषय वेगळा आहे. आम्ही फक्त मराठा समाजाच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. सर्व मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी एकत्र आले तर निश्चितपणे आरक्षणाच प्रश्न सुटू शकतो. मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण असणे गरजेचे आहे. कारण चांगले गुणवान विद्यार्थी सुध्दा आरणक्ष नसल्याने नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहेत. विधीमंडळातील सर्व सदस्यांनी अधिवेशनात मराठा आरक्षणाला पाठिंबा देतील. कोणताही आमदार वेगळी भूमिका घेणार नाही असी भूमिका येथे उपस्थित असलेल्या आमदार, खासदारांनी मांडली आहे.
मराठा समाजाचे कोल्हापुरात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अंदोलन पुकारल्यानंतर दोन दिवसापुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती श्रीमंत मालोजीराजे भोसलेे यांची भेट घेतली होती. आजच्या बुधवारच्या अंजोलनात मालोजीराजेही अंदोलनस्थळी आले आहेत. आजच्या बुधवारच्या मुक अंदोलनानंतर पुढील अंदोलनाची दिशा काय असेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
———- हे ही वाचा ———-
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण स्थगित निर्णय…
- बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवालबीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी…
- Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेसमुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा…
- Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारलेआंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले…
- शिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषणमराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घ्यावे, शासनाने सगे सोयरे यांचा…