महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करुन राज्यातील सुव्यवस्था बिघडणार? गृहमंत्रालयाने दिला ‘हा’ आदेश

महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करुन राज्यातील सुव्यवस्था बिघडणार? गृहमंत्रालयाने दिला ‘हा’ आदेश

Using goons from outside Maharashtra will disrupt law and order in the state? Home Ministry orders Police department

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर वातावरण तापलेले आहे. अनेक नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अशात यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठे वक्तव्य केले आहे. (dilip valase patil to maharashtra police)

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्यात येत आहे, असे मोठे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील गृहखात्यातील विभागाकडे सुद्धा अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. Using goons from outside Maharashtra will disrupt law and order in the state? Home Ministry orders Police department

राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही. अशा लोकांकडून हे काम सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच इतर राज्यातील लोक येऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी शक्यता आहे. गृहखात्यालाही अशा प्रकारचा अहवाल मिळाला आहे. त्यामुळे आता योग्य ती खबरदारी घेण्याची सुचना गृह विभागाने दिली आहे. कायदा व सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ती कारवाई करावी आणि आदेशाची प्रतिक्षा करु नये असा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी एक पत्राकर परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात आहे. राज्यात कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. तसेच राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहे, अशी माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे. Using goons from outside Maharashtra will disrupt law and order in the state? Home Ministry orders Police department

महत्वाच्या बातम्या-

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice