India’s ‘Chandrayaan-3’ mission successful; The Vikram lander landed on the South Pole separately
बंगळूर – भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम बुधवारी यशस्वी झाली. चांद्रभेटीची आस घेऊन निघालेल्या ‘चांद्रयान ३’ मधील विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान बग्गीसह ठरल्यानुसार आज सायंकाळी ६.०३ मिनिटांनी अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरला आणि ‘चांद्रविजय’ मिळविला. या भागात उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला India’s ‘Chandrayaan-3’ mission successful; The Vikram lander landed on the South Pole separately
‘चांद्रयान ३’ उतरण्यासाठी केवळ १८ मिनिटांचा कालावधी राहिला होता. हृदयाचे ठोके वाढलेले होते.गेल्यावेळच्या अपयशाची कटू आठवण नाही म्हटले तरी मनात डोकावत होती, कारण चांद्रभूमीवर उतरण्यासाठी दोन-अडीच किलोमीटरचे अंतर असताना ‘चंद्रयान २’चे नियंत्रण सुटले होते आणि ते आदळले. यानाबरोबरच तुकडे झाले होते ते शास्त्रज्ञांच्या नव्हे भारताच्या आशा- आकांक्षांचे… ‘इस्रो’च्या अध्यक्षांच्या भावनांचा बांध तिथेच फुटला होता. मात्र यावेळी असे व्हायचे नव्हते.
‘चांद्रयान-3’ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला आहे. आज (23 ऑगस्ट) सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयानाचं लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड झालं. यानंतर काही तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर विक्रम लँडरमध्ये असणारं प्रज्ञान रोव्हर हे बाहेर आलं आहे.
चांद्रयानाच्या लँडर मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा समावेश होता. विक्रम लँडर चंद्रावर लँड झाल्यानंतर तिथे बरीच धूळ उडाली होती. ही धूळ खाली बसल्यानंतर हळू हळू प्रज्ञान रोव्हरला लँडरमधून बाहेर काढण्यात आलं. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ रोव्हर चालवणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.
आता विश्वाच्या, त्यातही विशेषकरून पृथ्वीच्या निर्मितीची रहस्ये उलगडण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात होईल. आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीन हे तीनच देश चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले आहेत, त्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळाला आहे.‘चांद्रयान ३’ चा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचकारी होता. सर्व भारतीय आज जिवाचे कान करून ऐकत होते. डोळे दूरचित्रवाणी संचापासून हटत नव्हते. India’s ‘Chandrayaan-3’ mission successful; The Vikram lander landed on the South Pole separately