कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन ; कृषि कार्यालयाचे शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 10 :- कापूस पिकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे. अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबीबोंड अळीचा प्रादूर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच डोमकळी म्हणतात.
डोमकळी कशी ओळखावी : पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते. पाकळयांना लाळेद्वारे एकमेकांना जोडुन स्वतःला स्वरक्षणासाठी बंद करून घेते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अश्या कळ्या म्हणजेच डोमकळया. डोमकळया तोडून पाकळयांना वेगळे केल्यास, पाकळया एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात. बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते.या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंड्यातून निघालेली अळी,ताबडतोब पाते, कळ्या, फुले यांना छिद्र करून आत मध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रुपांतर करते.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. उशीरा झालेल्या प्रादुर्भावामध्ये नुकत्याच लागलेल्या बोंडावर किंवा उशीरा लागलेल्या फुलांवर गुलाबी बोंड अळीची मादी पतंग अळी घालते. या फुलामधुन किंवा लहान बोंडाला छिद्र पाडून अळी बोंडात शिरते, असे छिद्र बोंडाची वाढ झाल्यामुळे बंद होते. एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की, बोंडावरील छिद्र बंद असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत नाही. त्याठिकाणी फक्त काळा डाग दिसतो.अळी आतमध्ये राहून लहान हिरव्या बोंडामधील अपरीपक्व कापूस व सरकी खाऊन टाकते तर मोठया बोंडामध्ये फक्त सरकीवर आक्रमण करते. एक अळी बोंडामधील तिन ते चार सरकीच्या दाण्यांचे नुकसान करते. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळया आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात. प्रादूर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात, त्यामुळे रूईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
डोमकळीचे नियंत्रण : डोमकळया गोळा करून अळीसह नष्ट कराव्यात, जेणेकरून गुलाबी बोंडअळीची पुढची पिढी तयार होणार नाही व प्रादुर्भाव होण्याच्या मुळ कारणाला आळा घालता येईल. ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधील माशीचे कार्ड (1.5 लाख अंडी / हे.) शेतामध्ये लावावेत. कामगंध सापळे १० प्रति हेक्टरी लावावेत.कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता गरजेनुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा 30 मिली / 10 लिटर. थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी किंवा 20 ग्रॅम/10 लिटर इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम / 10 लिटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
==========================================================================================
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर: झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाची कहाणीZohran Mamdani Elected New York City Mayor in Historic Win;
- मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाने खळबळ; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दोन अटकेत!Manoj Jarange Patil Alleges Rs 2.5 Crore Murder Plot by
- वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षकच खरा राष्ट्रनायक – डॉ गोविंद नांदेडेमाहूर (नांदेड) :- (ज्ञानेश्वर कऱ्हाळे) शिक्षकांनी अतिशय उत्साहाने, आनंदाने वर्गात

