नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलाेली विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (मंगळवार) पंचायत समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला आहे. ही मतमोजणी १४ टेबलांवर ३० फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला. यंदा ६४ टक्के मतदान झाले हाेते. या वाढलेल्या मतदानाचा काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे आणि वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यापैकी काेणाला फायदा हाेणार हे आज समजणार आहे. ३० व्या फेरी अखेर काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर (1,08,840 एकूण मते) 41 हजार 933 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली आहेत. दरम्यान नांदेडकरांनी दाखवून दिले हे नांदेड आहे पंढरपूर नव्हे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नांदेडचे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. deglur-biloli-assembly-bypolls-result-nanded-political-news-sml80
आज सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीस Deglur Biloli byelection Counting Begins प्रारंभ झाला. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक नियुक्त करण्यात आला आहे.
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्याची पुनरावृत्ती देगलूर-बिलाेली विधानसभा क्षेत्रात होणार की महाविकास आघाडी आपली जागा कायम राखणार याची उत्सुकता राज्यातील जनेतस लागून राहिली आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.जितेश अंतापूरकर – 1,08,789 सुभाष साबणे – 66,872 डॉ. उत्तम इंगोले – 11,347 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. त्यांचे मताधिक्य 41933 एवढे आहे.
====================================================
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहे
- Pahalgam terrorist attack | जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यात 26 पर्याटक ठार, महाराष्ट्रातील सहा जण – वाचा सविस्तर
- क्रिकेट क्षेत्रात खळबळ; लिंग परिवर्तन केलेला आर्यन किंवा अनाया बांगर पुन्हा चर्चेत, लालनटॉप दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप
- प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची प्रशासनातील लुडबुड, सिईओ यांना खटकली ?
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?