लसणासोबत हे घ्या हार्ट अटॅक येणार नाही.

लसणासोबत हे घ्या हार्ट अटॅक येणार नाही.

Take it with garlic to prevent heart attack


लसूण हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा हा पदार्थ यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हंटले जाते कारण घरातील हा पदार्थ कसल्याही प्रकारचा हृदयरोग असेल, हृदया संबंधी कसल्याही तक्रारी असतील तर या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतोच.

सोबतच बऱ्याचशा व्यक्तींना सांधेदुखी असते , सांध्यांमध्ये कटकट आवाज येत असेल, हातापायांना बधिरता येत असेल, हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील अशा सर्व समस्या, सोबतच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ , घाबरल्या सारखे होते , BP चा त्रास , शुगर या सर्व समस्यांवर खालील उपाय गुणकारी ठरणार आहे.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम् लागणार आहे ते म्हणजे लसूण.
मित्रानो लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्परस, पोटॅशियम, आयर्न, आयोडीन, व्हिटॅमिन A, C असे अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे साधारण आजारापासून दुर्धर आजार नष्ट करण्याची क्षमता या लसणामध्ये आहे.
मित्रानो सोबतच लसणामध्ये ऑलेसिन नावाचा घटक आहे तो अँटीबॅक्टरीयल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आहे. शिवाय त्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते त्यामुळे डायबेटिज कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते म्हणून या लसणाचा वापर डायबेटिज असणाऱ्या व्यक्तींनी देखील करायचा आहे.

सोबतच ज्यांना खूप जुनाट सर्दी आहे अशा व्यक्तींनी लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवली तरी नाक मोकळे होण्यास मदत होते. घशात खवखव होत असेल तर ती सुद्धा बंद होते. असा देखील लसणाचा अत्यंत साधा आणि सोपा वापर करता येतो.

लसूण मध्ये ऑलेसिन नावाचे घटक रक्त पातळ करण्यास मदत करत असते. या सोबत जर तुम्ही रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असाल तर यादरम्यान लसूण कच्चा खाऊ नये. इतर पदार्थांमध्ये मिक्स करून त्याचे सेवन करण्यास काही हरकत नाही.

हृदयासंबंधी सर्व तक्रारी, हार्ट अटॅक आलेला असेल किंवा आयुष्यात कधीच हार्ट अटॅक न येण्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त आहे. सोबतच मित्रानो ज्यांना बऱ्याच दिवसांपासून Bp च्या गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या बंद होण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो.

उपाय-
मित्रानो यासाठी तुम्हाला गावठी लसूण घ्यायचा आहे जर तुम्हाला गावठी लसूण उपलब्ध नाही झाला तर जाड पाकळ्या असलेला लसूण घेऊ शकता. मित्रानो उपायासाठी साधारण १० लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. त्या १० पाकळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर एक कप दूध आपल्याला लागणार आहे. त्या एक कप दुधात त्या बारीक ठेचलेल्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि उकळायला ठेवायचं आहे. १० मिनिटात दुधाला उकळी आल्यानंतर ते कपात ओतून घ्यायचं आहे.


हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उपाशी पोटी घ्यायच आहे. मित्रानो ज्यांना दुधात घेणे शक्य नाही अशा लोकांनी १० पाकळ्या घेऊन अर्धा चमचा खडीसाखर टाकायची आहे अर्थात ज्यांना शुगर नाही त्यांनीच हा उपाय करायचा आहे.


आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे कुटून घ्या आणि याचे सेवन सकाळी उपाशी पोटी करायच आहे. मित्रानो हा उपाय तुम्हाला सलग ७ दिवस करायचा आहे. सांधेदुखी असेल, हृदया संबंधी कोणताही आजार असेल , रक्तामध्ये ब्लॉकेज असेल त्यावर अत्यंत गुणकारी म्हणून हा उपाय आहे.

======================================

<

Related posts

Leave a Comment