Covid 19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस म्हणजे काय ? जाणुन घ्या कोरोनाव्हायरस नविन व्हेरिएंट .

Covid 19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस   म्हणजे काय ? जाणुन घ्या कोरोनाव्हायरस नविन व्हेरिएंट .

कोविड 19 डेल्टा प्लस व्हेरिएंट Covid 19 Delta Plus Variant डेल्टा प्लस भारतात प्रथम सापडलेल्या डेल्टा व्हेरियंटची sub-lineage आहे, ज्याची K417N नावाचच्या spike protein mutation पासुन उत्पती झाली. काही वैज्ञानिक काळजी करत आहेत की या तयार झालेल्या व्हेरिएंट चा वेग अधीक आहे. 11 जून रोजी पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या बुलेटिनमध्ये भारतात “डेल्टा प्लस” नावाच्या प्रकारची नोंद झाल्याचे जाहीर केले होते.


भारताने बुधवारी जाहीर केले की,डेल्टा कोरोनाव्हायरस व्हेरिएंटमध्ये बदल घडवून आणणारी सुमारे 40 प्रकरणे आढळून आली आहेत. हे नविन Covid 19 Delta Plus Variant अधिक संक्रमणीय असल्याचे दिसते. या व्हेरिएंट प्रसार रोखण्यासाठी प्रतीबंधक उपाय करण्यासाठी राज्यांना चाचणी वाढविण्याचा सल्ला दिला.

डेल्टा प्लस म्हणजे काय? या नविन कोविड -19 डेल्टा प्लस व्हेरिएंट बाबत माहीती.
हा डेल्टा व्हेरियंटचा एक sub-lineage आहे जो भारतात प्रथम सापडला होता आणि त्याने K417N नावाच्या स्पाइक प्रोटीन उत्परिवर्तन spike protein mutation मधुन हा तयार झाला होता जो की, दक्षिण आफ्रिकेत प्रथम ओळखल्या जाणार्‍या बीटा प्रकारात आढळतो.

या व्हेरियंटच्या केसेस कोठे सापडले आहेत?
१ जून पर्यंत या व्हेरियंटच्या केसेस ब्रिटन (36), कॅनडा (1), भारत (8), जपान (15), नेपाळ (3), पोलंड (9), पोर्तुगाल (२२) रशिया (1), स्वित्झर्लंड (18), तुर्की (1), युनायटेड स्टेट्स (83). अशा 11 देशात 197 ​​रुग्ण आढळले आहेत.
भारतात बुधवारी, महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांत ही प्रकरणे आढळून आली आहेत. ही सर्व प्रकरणे 5 एप्रिल रोजी घेतलेल्यानमुन्यातील आहेत.
ब्रिटनने म्हटले आहे की त्याची पहिली 5 प्रकरणे 26 एप्रिल रोजी घडली असून ते नेपाळ आणि तुर्की येथून प्रवास केलेल्या किंवा तेथून प्रवास केलेल्या व्यक्तींचे संपर्क आहेत.

या व्हेरियंटची उपचार व काळजी कशी घ्यावी ? या डेल्टा sub-lineage विरूद्ध लसींच्या परिणामकारकतेची चाचणी घेण्यासाठी भारत आणि जागतिक स्तरावर अभ्यास चालू आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने पाठवलेल्या मार्गदर्शक निवेदनात म्हटले आहे की, “डेल्टा व्हेरिएंटच्या नविन प्रकारचे (WHO) आभ्यास व संसोधन करत आहे, कारण याच्या उत्पती संबंधित इतर प्रकारा सारखीच काम करत आहे.”

“सध्या तरी हा प्रकार सामान्य दिसत नाही, सध्या डेल्टा सीक्वेन्सच्या फक्त थोड्या तुकड्यांचा हिशेब आहे… डेल्टा आणि कन्सर्नचे इतर सर्किटिंग व्हेरिएंट्स पब्लिक हेल्थ जोखीम म्हणून कायम आहेत कारण त्यांनी प्रसारणामध्ये वाढ दर्शविली आहे.” .

परंतु भारताच्या आरोग्य मंत्रालयाने असा इशारा दिला आहे की ज्या भागात ही प्रकरणे आढळून आली आहेत त्यांना “ त्या केसेस तज्ञच्या नियंत्रणात ठेवणे, चाचणी वाढविणे, त्वरित संपर्क साधणे आणि प्राधान्य लसीकरण यावर लक्ष केंद्रित करून एकदंरीत सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद वाढविण्याची आवश्यकता आहे .”

नुकत्याच झालेल्या दुसर्‍या लाटेतुन जग सावरत असताना आता या नविन व्हेरियंटच्या केसेस वाढीच्या घटना समोर आल्यानंतर डेल्टा प्लसने भारतावर संसर्गाची आणखी एक लाट आणण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

“या नवीन व्हेरियंटमुळेच भारतातील तिसरी लाट येऊ शकते की नाही हे कोविड नियमाचे तथा निर्बंधाचे पालन करण्यावर अवलंबून आहे, परंतु हे एक कारण असू शकते,” असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ तरुण भटनागर यांनी सांगितले.

Related posts

Leave a Comment