छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून. सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या, सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते. छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या. आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता. त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नी होत्या. त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली. शंभूराजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे. सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या. Chhatrapati shivaji maharaj first wife & Sambhajiraje bhonsle mother information of maharani saibai bhosale
मातोश्री सईबाई….!!!
संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, शंभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच
आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते.
पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री ” जिजाउंनी ” घडवले.
शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई राणी साहेब अंथरुणाला खिळल्या. देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल
लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच
होती, तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता.
अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत
प्रतापगडी आले. सईबाईंच्या आजाराने महाराज थोडे चिंतेत असत. पण तलवारी संग लगीन लागलेल्या राजांना आपल्या भावविश्वात रमायला तरी वेळ होता कुठे, अखंड रयतेचा विचार करणारे राजे त्यांना उसंत ती कुठली. खानाशी कसे झुंजावे, कोणास काय कामगिरी द्यावी सारी सारी खलबत राजांच्या डोक्यात चालू. त्यातच कुठेतरी सईबाईंचा विचार मनास डंक लावून जाई.
सईबाई म्हणजे राजांच्या लहानपणातील सवंगडी. एकत्र खेळणे, बागडणे, भांडणे, रुसवे –
फुगवे अशा कैक कैक गोष्टी. हवा बदलीचा सुद्धा काही परिणाम दिसत नव्हता. म्हणून सईबाई आणि आऊसाहेब परत राजगडी आले. राजगडाहून राणीसाहेबांच्या प्रकृतीच्या बातम्या सतत प्रतापडी जात असत. राजगडाहून येणारा प्रत्येक संदेश. राजांच्या मनाला घर पाडत असे.
एक दिवस राजांना आलेल्या खलीत्यात त्यांना राजगडी भेटीस बोलावले. आणि राजे गेले देखील. गडावरील हवा सहन होत नव्हती म्हणून शिवापटण इथे एक वाद राजेंनी बांधला होता. सईबाई इथेच असत. राजे भेटीला आले. आणि भेटून गेले सुद्धा राजे आणि राणीसाहेब यांच्यातील संभाषण ऐकले ते इतिहाने. प्रतापगडी खानाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी सुरु झाली. महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व मुत्सद्दी प्रतापगडी पोहोचले. मावळखोरी महाराजांच्या बाजूने लढणार ही उत्साहवर्धक वार्ताही गडावर पोहोचली. श्री जगदंबा महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सर्वांच्या मनी दुणावू लागला. Chhatrapati shivaji maharaj first wife & Sambhajiraje bhonsle mother information of maharani saibai bhosale
==========================================================================================
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर