छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपुर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी संपुर्ण माहिती

Chhatrapati Shivaji Maharaj Information In Marathi शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती या लेखात आपण मराठी साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूर पराक्रमांची सविस्तर माहिती घेणार आहोत. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे, महाराष्ट्रात राज्यात असाच एक शक्तीशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होउन गेला. ते म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रीय कुलावंतस्… सिंहासनाधिश्वर…. महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज!!! या थोर राजाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ती ऐकताच अंगावर शहारे उभा राहायला हवे….

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती – Shivaji Maharaj Information In Marathi

नाव (Name)शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म (Birthday)१९ फेब्रुवारी १६३०
जन्मस्थान (Birthplace)शिवनेरी किल्ला
वडील (Father Name)शहाजीराजे मालोजीराजे भोसले
आई (Mother Name)जिजाबाई शहाजीराजे भोसले
पत्नी (Wife Name)सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव, सगुणाबाई शिंदे, गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे
मुले (Children Name)संभाजीराजे, राजारामराजे
मृत्यू (Death)०३ एप्रिल १६८०
लोकांनी दिलेली पदवीरयतेचा राजा, छत्रपती
शिवाजी महाराजांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj information Marathi

शिवाजी महाराजांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज भोसले (१६३० ते १६८०) हे एक महान भारतीय राजा आणि रणनितीकार होते. ज्यांनी १६७४ मध्ये पश्चिम भारता मध्ये मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मोगल साम्राज्याचा राजा औरंगजेब याच्याशी युद्ध करावे लागले. फक्त एतकच नाहीतर विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रज यांच्याशी देखील युद्ध करावे लागले. १६७४ मध्ये महाराजांवर रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध सुव्यवस्थित प्रशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक कार्यक्षम पुरोगामी प्रशासन प्रधान केले. त्यांनी युद्ध विज्ञानात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या आणि आणि गनिमी युद्धांची एक नवीन शैली म्हणजेच शिवसूत्र विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि कोर्टाचे शिष्टाचार पुनरुज्जीवित केले.

शिवाजी महाराजांचा जन्म:

Do you know the special things about Shivaji Maharaj? Birth Information

छत्रपती शिवाजी महाराज भारताला लाभलेले महान शूरवीर होते. तसेच मराठा साम्राज्याचे ते राजे होते. महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील म्हणजेच शहाजी भोसले विजापूरचा सुलतान सेनेचे सेनापती होते आणि महाराजांची आई जिजाबाई ह्या जाधव कुळात जन्माला आलेल्या एक हुशार, प्रतिभाशाली महिला होत्या.

असं म्हणतात जिजाबाई यांनी शिवाई देवीला आपल्याला एक बलवान पुत्र व्हावा अशी इच्छा मागितली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या आई-वडिलांच्या विचारासोबत जास्त मिळतंजुळतं होतं. महाराजांच्या चरित्रावर त्यांच्या आई-वडिलांचा खूप जास्त प्रभाव होता.

त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेलं. त्यांच्या आईंनी म्हणजेच जिजाबाईंनी महाराजांना राजनीती आणि युद्धाचं प्रशिक्षण दिलं तसेच परकिय सत्तेविरुद्ध आक्रमन करण्यासाठी लागणाऱ्या शिस्तीचं प्रशिक्षण दिले. महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला शिकवली. इतक्या लहान वयात देखील महाराज सगळ्या घटना समजायला लागले होते.

त्यांच्या हृदयात स्वराज्य निर्माण करण्याची एक ज्योत प्रज्वलित झाली होती. त्यांना स्वतः राज्य निर्माण करायच होत. आपल्या राज्यासाठी स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. त्याचवेळी महाराजांना काही धाडसी आणि खऱ्या मित्रांची सोबत लाभली ज्यांनी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मदत केली.

स्वराज्य निर्माण करण्याची ओढ :

महाराज लहानाचे मोठे शिवनेरीत झाले. शिवनेरी सोबतच माहुली व पुणे येथे देखील त्यांचे बालपण गेल्याचे दिसते. शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाबाई यांच्या हाती संपूर्ण महाराष्ट्राच्या जहागिरीची व्यवस्था सोपवली आणि त्यांना पुण्याला पाठवून दिले. जहागिरीची व्यवस्था प्रत्यक्ष दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नेमलेले काही विश्वासू सरदार बघायचे.

जिजाबाई सारखच शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशासाठी असलेलं प्रेम आणि कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय होत. अशा गुणांमुळे शिवाजी महाराज तयार झाले. आई कडून मिळालेल्या शिकवण आणि प्रेरणेतून शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची ओढ निर्माण झाली. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. महाराजांना वाटू लागलं जर आपल्याला आपल्या स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात पाहिजेत‌.

ही जाणीव त्यांना लहानपणातच झाली होती. दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर आता सर्व महाराष्ट्राची जबाबदारी शिवाजी महाराजांवर आली होती. त्यांनी हळूहळू गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार देखिल पाडल्या. आपल्याच वयाचे धाडसी असे युवा त्यांनी जमवले आणि त्या सोबतच त्यांनी देशपांडे, देशमुख इत्यादींशी वेगळ्या प्रकारे संबंध देखील साधले. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील काही पडके किल्ले, टेकड्या हळूहळू आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली.

तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला गड होता जो त्यांनी हस्तगत केला होता. त्यानंतर राजगड आणि हळूहळू एकुण ३६० गड त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत त्यावेळी तानाजी मालसुरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर अशी महान व्यक्तिमत्व होती.

स्वराज्य शपथ:

रायरेश्वर हा किल्ला स्वराज्य शपथेचा साक्षीदार आहे‌. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. फक्त सोळा वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर गडावर स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी धाडसी तरुणांचा एक समूह बनवला ज्याला त्यांनी “मावळा” असं नाव दिलं.

ह्याच मूठभर मावळ्यांच्या साथीने त्यांच्यामध्ये धर्मप्रेम निर्मित करून त्यांना लढाईचे प्रशिक्षण दिले आणि स्वराज्य संकल्पना समजावून सांगितली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी त्यांच्या रक्ताचे पाणी केले. केवळ पन्नास वर्षाच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना त्यांनी आपल्या त्यासमोर झुकायला लावले.

महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला. हिंदू धर्माला त्यांच्या हक्काचा राजा मिळाला. राज्याची जनता छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपले भाग्यविधाते म्हणून पाहू लागली तर कधी कधी काही जण त्यांना हिंदूपती पातशहा म्हणून देखील बोलावू लागले.

महाराजांनी हिंदू धर्माच्या वेदांचे, पुराणांचे आणि देवळांचे रक्षण केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षात महाराजांनी रायरेश्वरच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालसुरे, नरसप्रभू‌ गुप्ते, सोनोपंत डबीर, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल या मावळ्यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.

शिवाजी महाराज विवाह:

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह सण १४ मे १६४० मध्ये सईबाई निंबाळकर यांच्यासोबत लाल महाल पुणे येथे संपन्न झाला. महाराजांनी एकूण आठ लग्न केली. व्यावहारिक राजनीति चालू ठेवण्यासाठी महाराजांना एकूण आठ लग्न केली. मराठा सरदारांना एका छत्रीखाली आणण्यात महाराज यशस्वी झाले.

शिवाजी महाराजांच्या पत्नी:

महाराजांचा प्रथम विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी पार पडला. त्यानंतर सोयराबाई मोहितेपुतळाबाई पालकरसकवारबाई गायकवाडकाशीबाई जाधव व सगुणाबाई शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. याशिवाय गुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशीही त्यांचा विवाह झाला. सईबाई पासून संभाजी (१६५७ ते १६८९) व सोयराबाई पासून राजाराम (१६७० ते १७००) असे दोन मुलगे झाले.

शिवाय महाराजांना काही कन्या देखील होत्या. १६५९ मध्ये सईबाई यांचे निधन झालं. त्याच्यानंतर १६७४ मध्ये काशीबाई यांचे राज्यभिषेका पूर्वी निधन झालं. पुतळाबाई महाराजांसोबत सती गेल्या. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत म्हणजे सन १६८१ मध्ये सोयराबाई यांचे निधन झालं. सकवारबाई यांचं शाहूंच्या कारकिर्दीत निधन झालं.

पहिली लढाई तोरणा किल्ला कसा जिंकला:

सतराव्या शतकात साधारणता ज्याच्या हातात किल्ला तोच प्रांतावर देखे राज्य करणार असं मानलं जायचं. या वस्तूस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले परत मिळवले आणि काही नवीन किल्ले देखिल बांधले. प्रचंडगड सुद्धा शिवाजीं महाराजांनी परत आणला आणि त्याचे नाव तोरणा असे ठेवले.

वयाच्या सोळाव्या वर्षात मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासाठी महाराजांना जास्तीत जास्त किल्ले त्यांच्या हाताखाली हवे होते म्हणूनच महाराजांनी पहिले तोरणा किल्ला ताब्यात घ्यायचं ठरवलं. त्यावेळी तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता.

महाराजांनी १६४५ मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर १६४७ मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. आणि त्यांनी प्रचंडगड किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवले.

त्याच दरम्यान शिवाजी महाराजांनी कोंढाणा म्हणजे सिंहगड आणि पुरंदर असे किल्ले देखील आदिलशाहाच्या ताब्यातून मिळवले आणि पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. इतकंच नव्हे तर तोरणा किल्ला समोर असणारा मुरुंबदेवाचा डोंगर देखील महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याला दुरुस्त करून त्याचं नाव राजगड असे ठेवले. आणि हे सगळे शिवाजी महाराजांनी फक्त वयाच्या सतराव्या वर्षी केलं.

राज्यविस्तार:

त्या त्यावेळी विजापूरचे राज्य परस्पर संघर्ष आणि परकीय हल्ल्यांच्या काळातून जात होते अशाच वेळी महाराजांनी साम्राज्याच्या सुलतानाची सेवा करण्याऐवजी त्यांच्याच विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली. मावळ प्रदेश पश्चिम घाटाशी जोडलेला असून १५० किलोमीटर लांब आणि ३० किलोमीटर रुंद आहे. महाराजांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांना एक कुशल योद्धा मानले जाते. या प्रदेशात मराठा व इतर जातीचे लोक देखील राहात होते.

शिवाजी महाराजांनी या सर्व जातीच्या लोकांना मावळा असे नाव देऊन त्यांना संघटित केले आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या प्रदेशाबद्दल जाणुन घेतले. व तरुणांना आणून त्यांनी किल्ला बांधण्याचे काम सुरु केले नंतर मावळ्यांचे सहकार्य शिवाजी महाराजांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. त्यावेळी विजापूर परस्पर संघर्ष आणि मोगलांच्या आक्रमणामुळे त्रस्त झाले होते विजापूरचा सुलतान आदिलशहाने आपले सैन्य अनेक किल्ल्यांवरून काढून स्थानिक राज्यकर्त्यांच्या किंवा सरंजामशाहीच्या स्वाधीन केले होते.

आदिलशाह आता आजारी पडायला लागलेला विजापुर मध्ये शहरात चर्चा पसरली आणि शिवाजी महाराजांनी संधीचा फायदा घेत विजापुर मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्या नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी विजापूरचे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर किल्ला ताब्यात घेतला.

शिवाजी महाराजांनी आपला एक दुत आदिलशहाकडे पाठवला आणि त्याला सांगितलं की मी तुम्हाला आधीच्या किल्लेदार पेक्षा जास्त रक्कम देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे हा प्रदेश तुम्ही माझ्या ताब्यात करा महाराजांनी आदिलशहाच्या काही सरदारांना रिश्वत देऊन आधीच आपल्या पक्षांमध्ये सामील करून घेतले होते त्यामुळे आदिलशहाने आपल्या सरदारांच्या बोलण्यावरून महाराजांना तोरणा किल्ल्याचे अधिपती बनवून टाकले त्या किल्ल्यामध्ये मिळालेल्या संपत्तीने महाराजांनी किल्ल्यातील संरक्षणात्मक उणिवा दुरुस्त करण्याचे काम केले.

तिथूनच १० किलोमीटरच्या अंतरावर राजगड किल्ला होता. तो देखील शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात करून घेतला शिवाजी महाराजांच्या या पराक्रमांची खबर आदिलशहाला मिळाली तेव्हा त्यांनी शहाजीराजांना शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवायला सांगितले. परंतु शिवाजी महाराजांनी कशाचीही पर्वा न करता पुढे चाकणचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्याच्यानंतर कोंडाना किल्ला जिंकला.

अस्वस्त होऊन औरंगजेबने मिर्झा राजा जयसिंग यांना पाठवून शिवाजी महाराजांचे २३ किल्ले ताब्यात घेतले पुरंदर किल्ला देखील नष्ट करून टाकला त्या वेळी पुरंदराच्या तहामध्ये महाराजांना आपला मुलगा संभाजी याला मिर्झा राजा जयसिंहच्या ताब्यात सोपवावे लागलं. तर महाराजांनी कोंडाणा गड आपल्या ताब्यात करून घेतला कोंढाणा गडामध्ये तानाजी मालसुरे ह्यांना वीरमरण आले म्हणून शिवाजी महाराजांनी ह्या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले.

शहाजीराजे यांना सुपा आणि पुण्याची जहागीरदारी देण्यात आली होती सुपाचा किल्ला महादजी निळकंठराव यांच्या हाती होता. महाराजांनी रात्रीच्या वेळी सुपे किल्ल्यावरती आक्रमण केले आणि तो किल्ला देखील आपल्या ताब्यात करून घेतला बाजी मोहिते यांना कर्नाटकामध्ये शहाजी राजांकडे पाठवण्यात आले.

त्यांची सेना देखील शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सामील झाली त्याच वेळी पुरंदरचा किल्लेदार मरण पावला आणि किल्ल्याच्या उत्तराधिकार पदासाठी त्याच्या तीन मुलांमध्ये भांडणं सुरू झाली दोन भावांच्या आमंत्रणावरून शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर पोचले आणि त्यांनी मुत्सद्देगिरीच्या आधारे त्या भावांना बंदी बनवलं आणि अशाप्रकारे त्यांनी पुरंदर किल्ल्यावर देखील वर्चस्व प्रस्थापित केलं.

इसवी सन १६४७ पर्यंत महाराज चाकण ते निरा प्रदेशाचे अधिपती बनले. महाराजांच्या सेनेमध्ये आता वाढ होऊ लागली होती म्हणूनच महाराजांनी मैदान युद्धांमध्ये प्रवेश करायचं ठरवलं. घोडदळ सेना निर्माण करून महाराजांनी आबाजी सौंडर यांच्या नेतृत्वाखाली कोकण मध्ये एक सैन्य पाठवलं त्यांनी कोकण सह इतर ९ किल्ले देखील मिळवले याशिवाय ताला, मोसमळा आणि रायती किल्लेही शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. रायगड मध्ये लुटलेली सर्व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यात आली कल्याण चा राज्यपालांची सुटका झाल्यावर शिवाजी महाराज कुलाबा कडे वळाले.

अफझलखान वध:

महाराजांच्या शुरपणामुळे किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा वेग वाढला होता. त्यामुळे मुघल, निजाम, आदिलशाही मध्ये हाहाकार माजला होता. म्हणूनचं आदिलशाहने इसवी सन १९५९ मध्ये त्याच्या दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला तो त्याच्या सैनिकांवर अत्यंत तापला होता आणि म्हणूनच त्याने त्याच्या सैनिकांना आव्हान दिलं की तुमच्यातल्या कोणीतरी एकाने मला शिवाजीला मारून दाखवा. तेवढ्यातच अफजलखान नावाचा एक सैनिक समोर आला आणि त्याने तो विडा उचलला.

अफजलखान भली मोठी सेना घेऊन महाराजांना संपविण्यासाठी निघाला. वाटेमध्ये तो हिंदुधर्माची सगळे देऊळ नष्ट करू लागला तसेच गरिबांना देखील छळत होता. जेव्हा तो वाईजवळ आला तेव्हा महाराजांनी त्याला प्रतापगडावरून त्याच्याशी सामना करायचं ठरवलं. अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन तळ ठोकून बसला होता.

तहच्या दिवशी अफजल खानाचा असं म्हणणं होतं की महाराजांनी त्याला स्वतः भेटायला यावं तहामध्ये असं ठरलं गेलं की भेटीच्या वेळेस फक्त मोजकीच माणसं सोबत असतील आणि दोन्ही पक्षाने निशस्त्र राहावं. भेटीची वेळ ठरली. महाराजांना अफजल खानाच्या दगाबाजी बाबाजीचा अंदाज आला होता. म्हणून त्यांनी चिलखत चढवलं, सोबतच वाघनखे आणि बिचवा ठेवला आई जिजाबाईंच चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेऊन.

महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी निघाले महाराजांनी अतिशय हुशार पणे वाघनखे ठेवली होती त्यामुळे ती दिसणारी नव्हती. महाराजांसोबत त्यांचा विश्वासू सरदार जीवा महाल होता आणि अफजल खान सोबत सय्यद बंडा हा त्याचा सरदार होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाने छावणी बांधलेली त्याच छावणीमध्ये भेटण्याचं ठरलं होतं.

जसं महाराजांनी छावणी मध्ये प्रवेश केला तसा अफजल खानाने महाराजांना एकदम घट्ट मिठी मारली, महाराज यांना श्‍वास घेण्यास देखील त्रास होऊ लागला आणि तेवढ्यातच महाराजांच्या पाठीमध्ये कट्यारीचा वार केला महाराजांनी लगेच आपली वाघनखे बाहेर काढून ती अफजल खानाच्या पोटातून आरपार केली आणि त्याच्या सगळ्या आतड्या बाहेर काढल्या.

अफजलखानाचा ओरडण्याचा आवाज येताच सय्यद बंडा छावणीमध्ये आला आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर वार करायचा प्रयत्न केला परंतु तो वार जिवा महाला यांनी स्वतः वर घेतला आणि महाराजांचा जीव वाचला. आधीच ठरलेल्या रणनीतीमुळे गडावरून तोफेचे तीन बार उडवण्यात आले आणि त्याच इशारा वरून छावणी जवळच्या झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेल्या आपल्या सैनिकांना खानाच्या सैन्याला पाणी पाजले.

अफजल खानाचा मुलगा फाजलखान आणि त्याचे काही सैन्यदेखील वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले होते परंतु शिवाजी महाराजांचा हा पराक्रम बघून ते सर्व सैन्य, हत्ती, घोडदळ सगळं सोडून तिकडून पळून गेले.

पन्हाळ्याचा वेढा:

अफझल खानाच्या वधामुळे आदिलशाही दरबारामध्ये आता हाहाकार उडाला होता. आणि विजापुर मध्ये देखील शिवाजी महाराजांचा हा पराक्रम पोहोचला होता. त्यामुळे आता आदिलशाही व मोगल त्रस्त झाले होते त्यांना शिवाजी महाराजांची खूपच भीती वाटू लागली होती. शिवाजी महाराजांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याच आदिलशाही ठरवलं अफझलखानाच्या वधानंतर लगेचच शिवाजी महाराजांनी कोल्हापूर मधील पन्हाळा गड जिंकून घेतला.

ह्यामुळे आदिलशाहीना एक वेगळाच धक्का बसला होता. वाई ते पन्हाळा असा मोठा भाग आता मराठा साम्राज्य मध्ये सामील झाला होता. शिवाजी महाराजांना थांबवण्यासाठी अफजल खानाचा मुलगा फाजलखान आणि विजापूर कडून रुस्तम-इ-जमान हे दोघं मराठा साम्राज्यावर चालून आले आदिलशाही फौजानी मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं.

१८ डिसेंबर १६५९ मध्ये महाराजांनी फक्त ५००० सैन्याच्या आधारे या दोघांशीही युद्ध करून या दोघांचा पराभव केला. या दोघांच्या पराभवामुळे आदिलशाही फौजा मध्ये आता आग पेटून उठली होती. आणि म्हणूनच आदिलशहाने सिद्धी जोहर याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी पाठवून दिले.

सिद्धी जोहर सोबत २०,००० घोडदळ ४०,००० पायदळ आणि तोफखाने होते शिवाजी महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून बसले होते परंतु सिद्धी जोहर मराठा साम्राज्य वर चालून येतोय हे लक्षात आल्यावर शिवाजी महाराज २ मार्च १६६० मध्ये पन्हाळगडावर आले यावेळी सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला.

सिद्धीने पन्हाळ गडावर तोफांचा मारा सुरु केला परंतु पन्हाळगडाची उंची अतिशय उंच असल्या मुळे त्याचा मारा निकामी ठरला. सिद्धीने मराठी इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारूगोळा मागवल्या इंग्रजांनी महाराजांसोबत केलेला शांततेचा करार तोडून सिद्दी जोहरला मदत केली. सिद्धीने पुन्हा १० मे १६६० मध्ये पन्हाळगडावर पुन्हा तोफांचा मारा सुरु केला.

हा वेढा अतिशय कडक होता महाराजांना असं वाटलं की आता पावसाळा जवळ येतोय म्हणून हा वेढा जास्त वेळ टिकणार नाही. परंतु सिद्धी जोहरने पावसाळा पासून वाचण्यासाठी आपल्या छावण्यांवर गवत टाकण्यास सुरू केले होते. शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आदिलशहाचा अतिशय संताप उडाला होता म्हणूनच आदिल शहाणे मोगलांची मदत मागितली आणि औरंगजेबाने शाहिस्तेखानास ७७००० घोडदळ आणि ३०,००० पायदळ घेऊन स्वराज्यावर हल्ला करण्यास पाठवले.

आता मात्र आपल स्वराज्य धोक्यात आलं होतं. एकीकडे सिद्धी आणि दुसरीकडे शाहिस्तेखान. ९ मे १६६० मध्ये शाहिस्तेखान पुण्यामधील लाल महालामध्ये तळ ठोकून बसला. त्याच लाल महालामध्ये जिथे आपले शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले. जिथे जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले. आता त्याच लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे आपल्या जिवाची मज्जा करत होता. त्यासोबतच त्याने तिथल्या जनतेचा देखील छळ करायला सुरुवात केली होती.

वेढा अतिशय तीव्र होऊ लागला होता म्हणूनच नेताजी पालकर यांनी थेट विजापूरवर हल्ला केला परंतु विजापूरच्या सैन्यापुढे त्यांनी पराभव मानला. आता जिजाबाई यांना शिवबांची खूप चिंता वाटू लागली होती. कारण आता पावसाळा देखील चालू होणार होता आणि वेढा सुरू होऊन जवळपास तीन महिने व्हायला आले होते‌.

म्हणून जिजाबाईंनी स्वतः शस्त्रसज्ज होऊन पन्हाळा वेढा फोडून काढायचं ठरवलं परंतु नेताजी पालकर यांनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली सिद्धी हिलाल आणि त्यांचा मुलगा सिद्धी वाहवाह यांच्यासोबत नेताजी पालकर यांनी पन्हाळगडावर हल्ला केला परंतु युद्धामध्ये सिद्धी वाहवाह मारला गेल्यामुळे सिद्धी हिलाल यांनी माघार घेतली आणि नेताजी पालकर यांना वेढा फोडून काढण्यात अपयश आले.

आता मात्र पूर्ण जनता आणि जिजाबाई यांना शिवबांची काळजी वाटू लागली होती परंतु शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली त्यांनी त्यांचे वकील पंत यांना १२ जुलै १९६० रोजी एक पत्र घेऊन सिद्धी जोहरकडे पाठवले त्या पत्रात असे लिहिले होते की, मी (महाराज) माझ्या केलेल्या सर्व गुन्ह्यांची शिक्षा भोगण्यास आणि मिळवलेले सर्व संपत्ती आणि किल्ले तुमच्या ताब्यात करण्यास तयार आहे.

हे पत्र वाचून मोगलांना अतिशय आनंद झाला आणि इतके दिवस चालू असलेला हा वेढा थोडा हलका केला. याच संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी रात्रीच्या दरम्यान पन्हाळगडा सोडून विशाल गडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गडावरील ८००० सैनिकांमधील काही ६०० प्रमुख मावळ्यांसोबत विशालगडाकडे जायचे ठरवले. त्यासाठी महाराजांनी एक दुर्गम मार्ग निवडला स्वराज्यातील गुप्तहेरांनी हा मार्गातील खाचखळगे आधीच दूर करून ठेवले होते.

महाराजांनी विशालगडाकडे जाण्यास सुरुवात केली होती. महाराज पन्हाळगडावरून निसटले ही बातमी सिद्दीजोहरला कळताच त्याने आपल काही सैन्य महाराजांच्या पाठीमागे पाठवले आणि तो स्वतः गजापुरच्या खिंडी कडून महाराजांच्या पाठीवर गेला परंतु विशाल गडावर आधीच वेढा घालून ठेवला होता त्यामुळे तिथे लढाई करण्यामध्ये तो वेढा फोडून काढण्यात महाराजांचा खूप वेळ वाया गेला.

तो पर्यंत सिद्धी जोहर गजापुरच्या खिंडीपर्यंत पोचला होता त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना 300 मावळे सोबत पुढे विशालगडा कडे जाण्यासाठी सांगितले आणि स्वतः ३०० मावळ्यांसोबत गजापुरच्या खिंडीमध्ये सिद्धी जोहरच्या सैन्यात वाट अडवून बसले. १२ जुलै च्या रात्री निघालेले शिवाजी महाराज विशालगडावर दुसऱ्या दिवशी ६ वाजता पोचले तोपर्यंत सर्व मावळे आणि बाजीप्रभू सिद्दी जोहरची उपाशीपोटी झुंज देत होते.

या झुंजे मध्ये बाजीप्रभूच्या अंगावर खूप वार झाले त्यासोबतच खूप मावळे मरण पावलेत परंतु बाजीप्रभूंनी शेवटपर्यंत खिंड लढवून धरली होती. त्यांनी सिद्दीजोहरला खिंड पार करून जाऊच दिले नाही ते फक्त महाराज विशाल गडावर पोहोचण्याची वाट बघत होते. जसे महाराज विशाळगडावर पोहोचले तसे लगेच तोफांचा आवाज झाला आणि बाजीप्रभूंना खबर लागली की महाराज सुखरुप विशाळगडावर पोहोचले त्याचवेळी बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले.

बाजीप्रभूंनी आणि अनेक मावळ्यांच्या वाहिलेल्या रक्ता मुळे आणि बलिदानामुळे ही खिंड पावन झाली आणि गजापूरची खिंड पावन खिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.

सुरतची लूट:

सुरतची लूट या विजयामुळे शिवाजी महाराजांची प्रतीष्ठा वाढली होती. तब्बल ६ वर्ष शाहिस्तेखानाने १,५०,००० सैन्य घेऊन आपल्या स्वराज्याची पूर्ण वाट लावून टाकली होती. सतत होणारी युद्ध त्यामुळे स्वराज्याचा खजिना खंडित होऊ लागला होता मुघलांना या गोष्टींचा विचार करावा लागत नसते कारण की ते आपल स्वराज्य लुटून मस्त आरामात राहत होते त्यामुळे महाराजांनी याचा बदला घेण्याचं ठरवलं त्यामुळे महाराजांनी मोघलांच्या काही क्षेत्रांमध्ये उलटापालट करण्यास सुरुवात केली.

सुरत हा पाश्चात्त्य व्यापाऱ्यांसाठी बंदर आणि भारतीय मुसलमानांसाठी हजला जाण्याच प्रवेशद्वार होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये ६००० सैनिकांसोबत सुरत मधील व्यापाऱ्यांना लुटलं. ही लूट महाराजांनी वडीलधारे, स्त्रिया, छोटी मुले यांना जराही इजा होऊ न देता केली तसेच त्यांनी प्रत्येक धार्मिक गोष्टींच देखील भान राखलं म्हणजेच त्यांनी कुठलेही मज्जित किंवा चर्च उधवस्त न करता ही लूट केली. या लुटल मुळे दोन गोष्टी सिद्ध करता आल्या एक म्हणजे तर मोगल सत्तेला आवाहन आणि दुसर म्हणजे स्वराज्याच्या खजिन्यात भर.

पुरंदरचा तह:

शिवाजी महाराजांची प्रगती बघता आदिलशहा अस्वस्थ झाला आणि त्याने शहाजी राजांना शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले परंतु शिवाजी महाराजांनी शहाजी महाराज यांची पर्वा न करता आपले पराक्रम चालूच ठेवले. तेव्हा आदिलशहाने १६४९ मध्ये शहाजीराजांना कैद करून ठेवले‌. आदिलशहाचे बहुतेक किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते म्हणूनच शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखान यांची नेमणूक केली.

या लढाईसाठी शिवाजी महाराजांनी पुरंदर हा किल्ला निवडला परंतु त्यावेळी पुरंदरचा किल्ला आपल्या मराठ्यांच्या ताब्यात नव्हता त्यावेळी तो किल्ला महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांवर खूप बिकट परिस्थिती होती तिकडे त्यांचे वडील आदिलशहाच्या ताब्यात होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या मुळे स्वराज्य धोक्यात होते. त्याच वेळी नेमकी पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार मरण पावला आणि किल्ल्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या तीन मुलांमध्ये भांडणं सुरू झाली.

हीच संधी साधून शिवाजी महाराज आत मध्ये शिरले. मराठ्यांनी फत्तेखानाशी लढाई करून हा किल्ला जिंकला. या लढाईमध्ये शिवाजी महाराजांना खूप मोठे यश प्राप्त झाले. त्यानंतर १६५५ मध्ये नेताजी पालकर या विश्वासू सरदाराची या किल्ल्याचा सरनोबत म्हणून नेमणूक केली. महाराज इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरील सुरत बंदरच्या मुख्य शहरांमध्ये दाखल झाले.

सुरत येथील लूट, शाहिस्तेखानाचा पराभव या सगळ्या कारणांमुळे औरंगजेब अतिशय संतापला आणि त्याने शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी मिर्झाराजा जयसिंह त्याची नेमणूक केली मिर्झा राजा जयसिंह हा ८०,००० सैन्य घेऊन ५००० पठाण आणि दिलेरखानास सोबत पुरंदर गडावर पोहोचला आणि पुरंदरला वेढा घातला.

जयसिंह सोबत असलेल्या दिलेरखानने वज्रगडावरुन पुरंदर वरती तोफांचा मारा सुरु केला आणि पुरंदरचा खिंण्डर पडला मग मुघल सैन्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केले आणि खानाचे माचीवर मुरारबाजी सोबत युद्ध झाले आणि मुरारबाजी हरले पराभव अपरिहार्य आहे म्हणून महाराज तहाच्या अटीनुसार शरण जाण्यास तयार झाले आणि शेवटी ते ११ जून १६६५ मध्ये पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी केली या तहामध्ये महाराजांनी मोगलांना तेवीस किल्ले दिले.

आग्र्याची भेट व सुटका:

महाराजांचे जीवन खूप संघर्षमय होतं. एक संकट गेलं की दुसरे संकट त्यांची वाट बघत असायच. १६६६ मध्ये महाराजांना औरंगजेबाने दिल्लीला बोलावले महाराजांनी विजापूर वर केलेला आक्रमणावर बोलण्यासाठी औरंगजेबाने त्यांना दिल्लीला बोलावले. महाराज नव वर्षाच्या संभाजी सोबत दिल्लीला पोहोचले.

परंतु दरबारात पोहोचल्यावर औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला हे महाराजांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी लगेचच दरबाराच्या बाहेर गेले परंतु औरंगजेबाने त्याच्या सैनिकांना त्यांना अटक करायला सांगून त्यांना नजरकैदेत ठेवले आणि लवकरच त्यांना आग्र्याला जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे पाठवून देण्यात आले.

शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि शूर पणामुळे प्रत्येकाला शिवाजी महाराजांची धास्ती होती. ही धास्ती मिर्झा राजे रामसिंग यांना देखील होती. म्हणूनच त्यांनी महाराजांवर एकदम खडक पहारा ठेवला होता‌. आता महाराजांची सुटका होणं थोड अवघड वाटू लागल होत. परंतु प्रत्येक वेळी प्रमाणे महाराजांनी यावेळी सुद्धा एक छानशी युक्ती शोधून काढली महाराजांनी आजारी असण्याचे नाटक केले. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना ठिकाणावरून मिठाईचे पेटारे येऊ लागले.

आधी तर हे पेटारे खूप खडक पद्धतीने तपासले जायचे परंतु काही वेळ निघून गेल्यानंतर तपासणीमध्ये थोडा हलगर्जीपणा दिसू लागला. कधीकधी तर हे पेटारे न तपासता आत जायचे याच संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एका एका पेटार्‍यामध्ये बसून निसटले. त्यांच्या जागी त्यांचा विश्वासू सरदार हिरोजी फर्जद हे त्यांचे कपडे घालून महाराजांच्या अंगठीच्या खुणा दिसतील अशा प्रकाराने त्या खोलीत झोपून राहिले.

महाराज थोडा दूर वर पोहोचल्यावर ते देखील पहारेकर्‍यांना तुरी देऊन‌ निसटले. खोलीत काहीच हालचाल होत नसल्यामुळे पहारेकऱ्याने शोधाशोध सुरु केली. त्याच्या नंतर त्यांना समजलं की शिवाजी महाराज येथून देखील निसटले आहेत. हे त्यांना शिवाजी महाराज निसटून गेल्यावर २४ तासांनी समजले. वेशांतर करून स्वराज्यात शिवाजी महाराज स्वराज्याकडे न जाता ते मथुरेला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या काही विश्वासू सरदार आणि संभाजी राजांना पुढे पाठवून दिले.

तेव्हा देखील महाराजांना खूप खबरदारी घ्यावी लागली ते स्वतः खूप अडचणी पार करून येथे पोचले होते. एवढेच नव्हे तर महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये महाराजांनी निर्माण केलेल्या अष्टप्रधानमंडळाने स्वराज्याचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला होता.

महाराष्ट्रात परतल्यानंतरच्या हालचाली:

आता शिवाजी महाराज महाराष्ट्रात पुन्हा परतले होते. दिल्लीला झालेला अपमानाचा बदला आता घेण्याची वेळ आली होती म्हणूनच शिवाजी महाराजांनी पुन्हा एक रणनीती आखली आणि त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले तेवीस केल्ले पुन्हा जिंकून घेण्याच ठरवलं. त्याच प्रमाणे त्यांनी पहिला किल्ला कोंढाणा जिंकण्याच ठरवलं. कोंढाण्याच्या लढाईमध्ये आपण यशस्वी झालो परंतु आपले शूर वीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. बाकीचे उरलेले किल्ले देखील आपण यशस्वीरीत्या परत घेतले.

मोगल-मराठा संघर्ष:

उत्तर भारता मध्ये बादशहा होण्याचं स्वप्न औरंगजेबाचा अपूर्ण राहिलं. हे स्वप्न पूर्ण होत नसल्याच समजल्याने त्याने आता दक्षिणेकडे लक्ष देण्याचं ठरवलं‌. त्यामुळे शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचा वर्चस्व, हे औरंगजेबाला चांगलंच माहीत होतं. म्हणूनच त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला दक्षिणेचा सुभेदार बनवलं शाहिस्तेखान १,५०,००० च सैन्य सोबत घेऊन स्वराज्यावर चालून आला.

तो पुणे येथील लाल महालात तळ ठोकून बसला. त्यासोबतच त्याने तिकडच्या जनतेचा देखील खूप छळ केला म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्याला धडा शिकवण्याचा ठरवलं. आणि त्यांनी त्यांच्या ३०० सैनिकांसोबत शाहिस्तेखानावर ते चालून गेले. रात्रीची वेळ साधून त्यांनी युद्धास सुरुवात केली त्यावेळी या युद्धामध्ये शाहिस्तेखान तर वाचला पण त्याला त्याची चार बोटं गमवावी लागली.

या युद्धामध्ये शाहिस्तेखानाचा मुलगा आणि त्या सोबतच काही मोजता न येणारे सैन्य मारले गेले. शाहीस्तेखानामुळे स्वराज्याची संपूर्ण वाट लागली होती म्हणूनच आता या गोष्टीचा बदला घेण्याच महाराजांनी ठरवलं होतं. त्यांनी सुरत हे त्यावेळेस मोगलांच्या काळात होतं सुरत येथे उलटापालट करण्याचं महाराजांनी ठरवलं आणि त्यांनी कोणत्याही जेष्ठ, स्त्रिया व लहान मुलांवर अत्याचार न करता अतिशय हुशार पणे ही लूट पार पाडली.

पन्हाळा, पुरंदरचा तह या सगळ्या गोष्टींमुळे औरंगजेब अतिशय भडकला होता आणि म्हणून त्याने महाराजांना दिल्ली येथे चर्चा करण्यासाठी बोलावलं परंतु तिथे गेल्यावर शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला सन्मान मिळाला नाही आणि त्यांनी औरंगजेबावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. हे औरंगजेबाला सहन झाले नाही आणि त्याने शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठवून त्यांना नजरकैदेत ठेवलं आणि त्यांच्यावर ५००० सैनिकांचा पहारा लावला आणि शिवाजी महाराजांना मारून टाकण्याच पण ठरवलं.

परंतु महाराज येथून देखील सुखरूप सुटले. त्यावेळी महाराजांसोबत संभाजीराजे देखील होते त्यामुळे संभाजीराजांना मथुरे येथील एका विश्वासू ब्राह्मणाच्या घरी सोडून महाराज वाराणसी, पुरी हे सगळं पार करून पुढे स्वराज्याकडे आले. या प्रकरणामुळे औरंगजेबाला जयसिंह  वरती संशय आला आणि त्याने जयसिंहला विष देऊन मारून टाकले.

१६६८ मध्ये जसवंत सिंगने पुढाकार घेतला मुळे महाराजांनी मोगलांशी दुसरा तह केला औरंगजेबाने महाराजांना राजा असल्याचे मान्य केले आणि त्याने महाराजांना त्यांचा मुलगा संभाजी आणि ५००० मनसबदारी मिळाली. व तसेच त्यांना पुणे, चाकण, सुपा हे राज्य देखील परत देण्यात आले. पुरंदर आणि सिंहगड मुघलांच्या ताब्यात राहिले. १६७० मध्ये महाराजांनी सुरत मध्ये दुसरी लुट टाकली आणि तिथून त्यांना १३२ लाखांची संपत्ती मिळाली आणि परत येताना त्यांनी मोगलांचा पराभव देखील केला.

आदिलशहामराठेइंग्रज:

२४ नोव्हेंबर १६७२ मध्ये अली आदीलशहा याचं निधन झालं. त्यानंतर त्याचा मुलगा सिकंदर हा केवळ सात वर्षाचा होता. तो गादीवर बसला आणि नेमकी त्याच वर्षी विजापूरचा सरदार असलेला रुस्तम जमान याने युद्ध पुकारले. विजापूर मधील अंतर्गत युद्धाचा फायदा घेऊन महाराजांनी १६७३ मध्ये विजापूरवर हल्ला केला.

विजापूर मधील महत्त्वाची स्थळे विजापूरचे प्रमुख सरदार अब्दुल मोहम्मद, खवासखान अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान यांच्या हाती होते विजापूरचे मुख्यप्रधान पद खवासखान याच्याकडे होते. महाराजांच लक्ष आधीपासूनच सातारा, कोल्हापूर, भागांबर वर होत.६  मार्च १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा गड जिंकून घेतला परत महाराजांनी सातारा, कोल्हापूर ही स्थळे पण जिंकून घेतली. मुघल आणि विजापूरच्या सरदार युती करून मराठ्यांवर चालून आले.

परंतु मराठ्यांनी न घाबरता यांनादेखील पळवून लावले. ठाणे, लक्ष्मेश्वर, संपगांव, बंकापूर, हुबळी अशी स्थळे लुटली. तिकडे कोकणामध्ये महाराजांनी मोगल आणि सिद्धीचा देखील दणदणीत पराभव केला. परंतु या युद्धामध्ये मराठ्यांचा आरमारी अधिकारी दौलतखान हे देखील जखमी झाले.

इंग्रज सिद्दी आणि मराठ्यांमध्ये मध्यस्थी करू पाहत होते परंतु सिद्दी आरमारला इंग्रज मुंबई मध्ये आश्रय देतात हि गोष्ट लक्षात ठेवून महाराजांनीही मध्यस्थी नाकारली. इंग्रजांची मुख्य मागणी राजापूर आणि इतर  स्थळातील वखारीच्या लूट बद्दल भरपाई अशी होती.  जंजिरा किल्ला कधीच मराठ्यांच्या ताब्यात जाऊ नये असे इंग्रजांना वाटायचं परंतु व्यापार आणि मुक्त संचार करता यावा म्हणून त्यांना मराठ्यांशी मिळत घ्यावाच लागला. शेवटी १६७४ मध्ये इंग्रजांनी महाराजांशी तह केला.

राज्याभिषेक:

शिवाजी महाराज हे हिंदवी साम्राज्याचे राजे होते. याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. परंतु सिद्धांत दृष्ट्या त्यांची स्थिती राजासारखे किंवा एका सम्राटा सारखी नव्हती. ते अभिषिक्त राजे नसल्यामुळे त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना राज्यकारभारात अनेक तोटे दिसून येऊ लागले होते. याशिवाय महाराजांनी कितीही अपार धन मिळवले असले किंवा त्यांच्या कडे कितीही मजबूत लष्कर किंवा नौदल असली तरी मुगलांसाठी ते एक जमीनदार होते.

विजापूर साठी ते जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते. शिवाय ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांन कडून स्वामीनिष्ठेची राज्यभिषेका शिवाय अपेक्षा करणं जरा कठीणच होतं. तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेणे हे राज्याभिषेका शिवाय करणे आवश्यक होतं. त्यामुळेच त्यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी व पुढील भविष्याचा सुरक्षिततेची हमी देण्यासाठी राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचं होतं.

त्यावेळेची जनता महाराजांकडे हिंदवी स्वराज्य साठी लढणारा अधिपती म्हणून पाहत होती. महाराजांचे देखील हेच स्वप्न होतं की आपले स्वतःचे हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा आणि आपल्या हक्कासाठी लढायचं. आता हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे त्याचा कोणी तरी हिंदू छत्रपती हवाच‌. त्यामुळे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले.

परंतु इथे देखील एक गंमत घडली प्राचीन हिंदू शास्त्र प्रमाणे कोणीतरी क्षत्रिय धर्माचा व्यक्तीच राजा होऊ शकतो. आणि महाराज भोसले कुळातून असल्या मुळे महाराज कुणबी होते आणि ते ब्राह्मण ही नव्हते त्यामुळे भोसले कुळ शूद्र होते. आणि अशा कुळातील कोणीतरी राजा होणार शक्यच नव्हतं. राजा होण्यासाठी क्षत्रिय होण अत्यंत गरजेचं होतं.

त्याशिवाय भारतातील सर्व ब्राम्हणांचा आशिर्वाद मिळणं अशक्य होतं. राज्याभिषेकावर आक्षेप घेणाऱ्यांची तोंड बंद करणाऱ्या एका पंडिताची गरज होती आणि ही गरज गागाभट्ट यांच्या रूपाने पार पडली. ते ब्रह्मदेव वा वास आणि काशी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. सुरुवातीस खूप अडचणी आल्या परंतु काही काळाने गागाभट्ट शिवाजी महाराजांना क्षत्रिय कुलवंत असल्याचे मानण्यास मंजूर झाले.

भोसले कुळाचा उदयपूरातील क्षत्रिय घराण्याशी संबंध होता. हे सिद्ध करण्यामध्ये बाळाची अवजी आणि त्यांचे काही इतर सरदाराने पुढाकार घेतला होता. खूपच चढाओढी नंतर भोसले कुळ हे प्रभू रामचंद्रांच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय कुळ आहे. हे सिद्ध झालं. या भक्कम पुराव्याची शहानिशा केल्या नंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन महाराजांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. त्या नंतर ६ जून १६७४ मध्ये महाराजांवर रायगड मध्ये राज्यभिषेक झाला.

राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा:

राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला परंतु त्याच्या नंतर काही दिवसातच महाराजांचा मोठा आधार असणाऱ्या जिजाबाई मरण पावल्या. महाराजांनी कर्नाटक प्रांताकडे वळण्याचे ठरवले तस तर महाराजांना कोणाची भीती नव्हती. आदिलशाहीतीची तर नाहीच नाही, परंतु असं बघायला गेला तर औरंगजेब हा आपल्या स्वराज्य नष्ट करण्या वरच टपून होतात. म्हणूनच एखादे संकट देव न करो पण जर एखादे संकट आले तर दक्षिणेकडे देखील काही सैन्य असणं अतिशय गरजेचं होतं म्हणून महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण मोहीम आखली.

दक्षिण मोहीम:

दक्षिण मोहीम मध्ये महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली होती. कर्नाटकातील जहागीरदारी शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्याकडे होती त्यामुळे महाराजांचा यातून असा हेतू होता की त्यांच्या भावाने त्यांना स्वराज्य निर्माण मध्ये मदत करावी. महाराज गोवळकोंडा मध्ये पोहोचल्यावर तिकडच्या कुतुबशहाने त्यांना अतिशय आदराने वागवले त्यांचे छान स्वागत करून त्यांना त्यांच्याच समान गादीवर बसवले.

चेन्नईच्या दक्षिण बाजूस जंजी किल्ला आहे हा किल्ला रायगडा सारखाच अतिशय प्रचंड आणि महत्त्वाचा होता. महाराजांनी बघता बघता हा किल्ला देखील आपल्या ताब्यात करून घेतला. त्यानंतर महाराजांनी वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेण्याचे ठरवले. वेल्लोरच्या किल्ल्याला कित्येक दिवस वेढा घालून ही तो हातात येत नव्हता म्हणून महाराजांनी वेल्लोर समोरील डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला आणि क्षणातच तो किल्लादेखील महाराजांच्या ताब्यात आला.

असं करत महाराजांनी कर्नाटकामध्ये एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश मिळवला आणि इतर किल्ले जिंकले. महाराजांचा हेतू प्रमाणे त्यांनी त्यांचे भाव व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले परंतु ते काही फारसे उत्सुक नव्हते. ते महाराजांन सोबत थोडे दिवस राहिले आणि मग तंजोरला निघून गेले. आणि महाराजांच्याच फौजेवर हल्ला केला. परंतु महाराजांनी त्यांचाही पराभव केला. हे पाहून महाजन अतिशय दुःखी झालं म्हणून महाराजांनी त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांना अनेक पत्रे पाठवली आणि त्यांना दक्षिणेकडील काही प्रदेश देखील दिला.

शासनव्यवस्था:

शिवाजी महाराज एक कार्यक्षम आणि प्रबुद्ध सम्राट म्हणून ओळखले जात होते. त्यांना बालपणी पारंपारिक शिक्षण काही फारसे मिळाले नाही परंतु महाराज भारतीय इतिहास आणि भारतातील राजकारण चांगलेच ओळखून होते. शुक्राचार्य आणि कौटिल्य यांना त्यांनी आदर्श मानून बऱ्याच वेळा मुत्सद्दीपणाचा अवलंब करणे योग्य मानले.

आपल्या समकालीन मुघलांप्रमाणेच तेसुद्धा एक निरंकुश शासक होते, म्हणजेच संपूर्ण कारभाराची सत्ता राजाच्या ताब्यात होती. परंतु त्यांच्या प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी अष्टप्रधान नावाच्या आठ मंत्र्यांची एक परिषद होती. याच्यामध्ये मंत्र्यांच्या प्रमुखांना पेशवे असे म्हटले जायचे. अमात्य वित्त आणि महसूलच्या कामकाजाची करणारे मंत्री राजाच्या दैनंदिन कामांची काळजी घ्यायचे.

सचिव कार्यालयीन काम करायचे ज्याच्या मध्ये शाही शिक्का टाकने आणि करारांचे लेख तयार करणे या कामांचा समावेश असायचा. सुमंत हे परराष्ट्र मंत्री होते. सैन्याच्या प्रधानास सेनापती असे म्हटले जायचे. धर्मदाय आणि धार्मिक कार्य प्रमुखांना पंडित राव असे म्हटले जायचे न्यायाधीश हे न्यायालयीन कामकाज प्रमुख होते.

शिवाजी महाराज वंशावळ:

शिवाजी महाराजांना एकूण आठ बायका होत्या त्यांची काही नावे म्हणजेच सईबाई निंबाळकर, काशीबाई जाधव, गुणवंतीबाई इंगळे, पुतळाबाई पालकर‌, लक्ष्मीबाई विचारे, सकवारबाई गायकवाड, सगुणाबाई शिंदे, सोयराबाई मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती त्यातील एकाच नाव छत्रपती संभाजी भोसले आणि दुसराच नाव छत्रपती राजारामराजे भोसले.

महाराजांना कन्या प्राप्ती देखील झाली होती त्यांची नावे अंबिकाबाई भोसले (महाडिक) कमळाबाई (सावरकर बाईच्या कन्या) राजकुंवरबाई भोसले (शिर्के) (सगुणाबाई यांची मुलगी आणि गणोजी शिर्के यांची पत्नी) राणूबाई भोसले (पाटकर) सखुबाई निंबाळकर (सईबाईंची मुलगी) महाराजांच्या सुना आणि नाथ सुना – अंबिकाबाई, जानकीबाई, राजारामांच्या पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, सगुनाबाई संभाजींचा पुत्र शाहूंची पत्नी. नातवंडे- संभाजीचा मुलगा शाहू , ताराबाई राजाराम ची मुले दुसरा शिवाजी, राजसबाईची मुले दुसरा संभाजी. पतवंडे – ताराबाईचा नातू रामराजा याला शाहू मी स्वतः दत्तक घेतले, दुसऱ्या संभाजिंचा मुलगा द्वितीय शिवाजी.

शिवाजी महाराजांच्या वर लिहलेली पुस्तके:

शिवाजी महाराज वर अनेक पुस्तके, चित्रपट वेगवेगळ्या शैलीतून त्यांची जीवनशैली वर आधारित प्रस्तुत करण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांवर आज पर्यंत ६० हून अधिक पुस्तके लिहिण्यात आली आहेत आणि ही पुस्तके फक्त मराठी भाषेतच नाही तर इतर भाषांमध्ये देखील आहेत. त्यापैकीच काही ललित साहित्य खालील प्रमाणे आहेत आग्र्याहून सुटका, आज्ञापत्र, शिवछत्रपतींचे चरित्र,  राजा शिवाजी, शिवराय, गड आला पण सिंह गेला,  उष : काल‌‌, श्रीमानयोगी, कुळवाडीभूषण शिवराय, छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे, थोरलं राजं सांगून गेलं, शिवछत्रपती, शिवनामा, शिवभूषण, छत्रपती शिवाजी आणि सुराज्य, राजा शिवछत्रपती.

शिवाजी महाराजांचा मृत्यू – Shivaji Maharaj Death Information

मार्च 1680 च्या शेवटी, हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला, शिवाजी तापाने व पेचप्रसंगाने आजारी पडले ३ एप्रिल १६८० च्या सुमारास स्वर्गवासी झाले.

<

Related posts

Leave a Comment