निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा स्तुत्य उपक्रम 20 मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्ताने निसर्ग व सामाजिक पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेनुसार उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची पक्की भांडी वाटप करून त्यामध्ये पक्ष्यांना नियमित पाणी टाकण्यासाठी मंडळाने मातीची भांडी वाटप करण्याचे ठरवल्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते मातीचे भांडे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. A commendable initiative of the Nature and Social Environment Pollution Prevention Board

याप्रसंगी अण्णासाहेब हजारे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,उन्हाच्या तीव्रतेमुळे आपल्याला तहान लागली की आपण पाणी मागू शकतो परंतु निसर्गातील मुक्या जीवांचे तडफडून हाल होतात त्यांच्यासाठी पाणी व अन्नधान्य महत्वाचे आहे त्यामुळे मंडळाने हाती घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे.पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी मातीची भांडी वाटपाचा उपक्रम गावोगावी राबविला पाहिजे. A commendable initiative of the Nature and Social Environment Pollution Prevention Board

याप्रसंगी निसर्ग व समाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,आम्ही मातीची भांडी शाळा,विद्यालय,महाविद्यालय यांना देऊन ‘घोटभर पाणी व मूठभर धान्य’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू व शक्य तेवढी मातीची पक्की भांडी वाटप करू. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे,राज्य संघटक पोपट पवार सर,कार्याध्यक्ष अनिल लोखंडे,उपाध्यक्ष प्रकाश केदारी,संघटक दिलीप धावणे,पत्रकार विजय बोडखे व सुभाष कोंडेकर उपस्थित होते.

======

<

Related posts

Leave a Comment