अर्थकारणमंत्रिमंडळ बैठकमहाराष्ट्रराजकारण

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended For Old Pension Scheme

मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला (For old pension scheme demand) सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended

या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा काटकर यांनी केला. तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री यासंदर्भातील निवेदन विधानसभेत करतील. Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended

हायलाइट्स:

  • सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा
  • जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, समितीचे संयोजक विश्वास काटकर दावा

संप मिटल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण संप सुरु असल्याने अवकाळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांना खिळ बसली होती. मात्र आता संप मिटल्याने पंचनाम्यांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला असून राज्य सरकार सोबतच्या यशस्वी चर्चेनंतर आपण संप मागे घेत असल्याचं समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी सांगितलं आहे. राज्यात पूर्वलक्षी प्रभावानं जुनी पेन्शन योजना लागू होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 29
  • Today's page views: : 30
  • Total visitors : 504,593
  • Total page views: 531,351
Site Statistics
  • Today's visitors: 29
  • Today's page views: : 30
  • Total visitors : 504,593
  • Total page views: 531,351
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice