कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?|Who is the BJP’s presidential candidate Draupadi Murmu?

कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?|Who is the BJP’s presidential candidate Draupadi Murmu?

एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार NDA Presidential Candidate म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर जाणून घेऊया द्रौपदी मुर्मू कोण आहेत. आदिवासी समाजातील कुणी राष्ट्रपती आजवर भारतात झाले नाही, त्यामुळे आम्ही आदिवासी समाजातील व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचं ठरवलं. त्यानुसार द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एकमत झालं,” असे नड्डांनी यावेळी सांगितलं. Who is the BJP’s presidential candidate Draupadi Murmu?

कोण आहेत द्रौपदी मुर्मू ?

मुर्मू यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि नंतर ओडिशाच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वर्षी भाजपच्या एसटी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्या भाजपच्या तिकिटावर मयूरभंज (2000 आणि 2009) मध्ये रायरंगपूरमधून दोन वेळा आमदार होत्या.

द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. तत्पूर्वी1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या. Draupardi Murmu was born on 20 June 1958 in the village of Badiposi in Mayurbhanj district. She belongs to a tribal tribe called Santhal. Earlier in 1997, she was elected as a corporator from Raynagarpur Nagar Panchayat.

नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ (2015-2021) पूर्ण केला आहे.

देशाच्या नवीन राष्ट्रपतीची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच नावनोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे.

हेही वाचा : ——–

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice