देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

Bipin Rawat, the country’s first CDS, died in a helicopter crash

बिपीन रावत हे बुधवारी दुपारी 3 वाजता हवाई दलाच्या Mi-17VH या हेलिकॉप्टरमधून नियोजित व्याख्यान देण्यासाठी तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे जात होते. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले होते आणि ते वेलिंग्टनला जात होते. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत हे कुन्नूर येथून दिल्लीला जाणार होते. मात्र त्या आधीच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

दरम्यान अपघात झाला त्यावेळी बिपिन रावत यांच्याशिवाय या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह त्यांचे संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि भारतीय हवाई दलाचे कर्मचारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले. दरम्यान या अपघाताची संपूर्ण माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले आहे.

Bipin Rawat was on his way to Defense Services Staff College, Wellington in Tamil Nadu’s Coonoor district to deliver a scheduled lecture on an Air Force Mi-17VH helicopter at 3 pm on Wednesday. The helicopter had taken off from Sulur airbase and was en route to Wellington. After the event, Bipin Rawat was to leave Coonoor for Delhi. However, the helicopter had already crashed.

Apart from Bipin Rawat, a total of 14 people, including Rawat’s wife Madhulika Rawat, his defense assistant, security commandos and Indian Air Force personnel were traveling in the helicopter at the time of the accident. Some died on the spot in the accident. CDS Bipin Rawat was rushed to a military hospital in Tamil Nadu for treatment. However, Bipin Rawat died during the treatment. Meanwhile, Defense Minister Rajnath Singh has given full details of the accident to Prime Minister Narendra Modi and an inquiry has been ordered into the incident, the Air Force said.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice